शाळेत शिक्षकाचे कृत्य उघड; तीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन, ग्रामस्थांचा संताप

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका शिक्षकाने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली.

शाळेत शिक्षकाचे कृत्य उघड; तीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन, ग्रामस्थांचा संताप

School Incident

लोणी गवळी (School Incident) : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका शिक्षकाने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना बुधवार, दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी उघडकीस आली. ही बाब समजताच संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला चोप दिला.

महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) असे या शिक्षकाचे नाव असून, ते येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार होते. लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या या शिक्षकाने तिसरीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे.

मागील काही दिवसांपासून तो आपल्या वर्गातील काही मुलींशी गैरवर्तन करत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, ८ एप्रिल रोजी त्याने तिघी विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मुलींनी आपल्या पालकांना दिल्यानंतर संतप्त पालकांनी सकाळी सुमारे दहा वाजता शाळेत जाऊन शिक्षकाला मारहाण केली.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026