पातुर (Sarpanch post reservation) : पातुर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) व सर्वसाधारण सरपंच पदाची आरक्षण सोडत (महिला आरक्षणासह) आज तहसील कार्यालय पातुर येथे शांततेत पार पडली. अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. तहसील कार्यालयातील नवीन इमारतीत आयोजित या सोडत प्रसंगी तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, विविध पक्षांचे प्रतिनिधी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणाचा सविस्तर तपशील:
शासनाच्या नवीन आदेश व नियमांनुसार पातुर तालुक्यातील एकूण ५७ ग्रामपंचायतींसाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी २९ जागांवर महिलांसाठी आरक्षण निश्चित झाले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC):
तालुक्यातील ५७ पैकी ०७ ग्रामपंचायती या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिर्ला, पास्तुल, सस्ती, बोडखा, देऊळगाव, अंबाशी आणि आसोला या ७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ७ जागांपैकी ०४ जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या असून यामध्ये शिर्ला, सस्ती, देऊळगाव व बोडखा या ४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सर्वसाधारण (खुला प्रवर्ग):
तालुक्यातील उर्वरित २९ ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या २९ पैकी १४ ग्रामपंचायतींचे सरपंच पद (Sarpanch post reservation) सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये तुलंगा बु., मळसुर, बेलुरा बु., उमरा, आगीखेड, तुलंगा खुर्द, तांदळी खुर्द, सावरखेड, कार्ली, बाभुळगाव, चान्नी, बेलुरा खुर्द, पांदुर्णा व वहाळा बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सर्व उपस्थित नागरिकांच्या समक्ष पारदर्शक पद्धतीने सोडत काढून आरक्षणाची यादी वाचून दाखवण्यात आली व उपस्थितांचे आभार मानून सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांनी जाहीर केले. हे आरक्षण आगामी २०२५ ते २०३० मधील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी लागू राहणार आहे.
सरपंच पद आरक्षण
पातुर तालुक्यात सन २०२५ ते २०३० कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर
Sarpanch post reservation: पातुर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) व सर्वसाधारण सरपंच पदाची आरक्षण सोडत (महिला आरक्षणासह)
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Sarpanch post reservation
टैग्स:
Sarpanch post reservation
संबंधित सामग्री
हिंगोली तालुक्यातील १११ ग्रा.पं.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
Sarpanch post reservation: तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगोली येथील सभागृहात दुपारी १२ वाजता बैठक आयोजित
Sep 09, 2026