बनावट कागदपत्रे प्रकरण

बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी सहाय्यक सचिव निलंबित

Fake Documents Case: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहाय्यक सचिवाला बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याप्रकरणी सेवेतून निलंबित केले गेले.

बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी सहाय्यक सचिव निलंबित

Fake Documents Case

हिंगोली (Fake Documents Case) : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहाय्यक सचिव श्रीमती जे. आर. भंडारी यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याप्रकरणी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली यांनी दि. 25 एप्रिल रोजी हा आदेश जारी केला. प्राप्त आदेशानुसार, श्रीमती भंडारी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी अनुकंपा तत्त्वावर समितीच्या सेवेत रुजू होताना इयत्ता दहावी उत्तीर्ण असल्याचे टी.सी. व इतर कागदपत्रे सादर केली होती. 

मात्र, समितीने दि. 08 एप्रिल 2026 रोजी त्यांना दहावीच्या गुणपत्रिका व सनद सादर करण्याबाबत पत्र (Fake Documents Case) दिले. त्याला कोणतेही उत्तर न मिळाल्याने समितीने मुख्याध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हायस्कूल, पूर्णा यांच्याकडे शाळा सोडल्याच्या दाखल्याची शहानिशा केली.  शाळेने दि. 02 एप्रिल 2026 च्या पत्रान्वये सदर टी.सी. बनावट असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर भंडारी यांना 11 एप्रिल 2026 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यावर 16 एप्रिल 2026 रोजी त्यांनी उत्तर देताना इयत्ता नववी पास असल्याची दुसरी टी.सी. सादर केली.

प्रशासकांनी आदेशात नमूद केले की, दहावी पास असल्याचे बनावट टी.सी. सादर करून समितीची फसवणूक करण्यात आली. तसेच नववी पास टी.सी.वर कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती कशी दिली, हा प्रश्नही उपस्थित होतो. प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने व विश्वासघात केल्याने त्यांना निलंबित करण्यात येत आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे नियम 1967 मधील कलम 102 (5) व बाजार समितीच्या मंजूर सेवानियम 24 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन काळात त्यांना नियमानुसार 1/2 वेतन अनुज्ञेय राहील व या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी लावण्यात आली आहे.
 
या (Fake Documents Case) प्रकरणी सचिव एस. पी. मुंडे यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यालयास पत्र दिले होते. त्यानंतर अनेकदा पत्रव्यवहार होऊन अखेर दि. 25 एप्रिल 2026 रोजी प्रशासकीय समितीने निलंबनाचा ठराव मंजूर केला.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026