रिसोड नगरपरिषद

रिसोड नगर परिषदच्या कर विभागाची ऐतिहासिक कामगिरी

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषदेच्या कर विभागाने यंदाच्या आर्थिक वर्षात 91 टक्के कर वसुली केली आहे. मुख्याधिकारी सतीश शेवदा आणि कर निरीक्षक मेहमूद शहा यांच्या नेतृत्वात ही कामगिरी झाली.

रिसोड नगर परिषदच्या कर विभागाची ऐतिहासिक कामगिरी

Risod Municipal Council

91 टक्के कर वसुली

रिसोड (Risod Municipal Council) : मागील काही महिन्यापासून सातत्याने रिसोड नगर परिषद चा कर विभाग हा लाखो रुपयांच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेला आहे. सदर कर विभागातील एवढा मोठा घोटाळा प्रकरणी कारवाई संदर्भात रिसोड करांच्या नजरा अजूनही याकडे लागलेले आहेत.चालू आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर रिसोड नगरपालिकेच्या कर विभागाने थकीत कर वसुलीसाठी आक्रमक पाऊले उचलली आहेत. मुख्याधिकारी सतीश शेवदा यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागाचे प्रमुख महेमुद शहा यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने आतापर्यंत ९१ टक्के कर वसुलीचा टप्पा गाठला असून, या यशस्वी कामगिरीबद्दल प्रशासकीय वर्तुळात कौतुक होत आहे.

नगरपरिषद च्या (Risod Municipal Council) कर विभागाकडून एकूण मागणी 3 कोटी 4 लाख 51 हजार रुपये होती.चालु मागणी 2 कोटी 20 लाख 25 हजार,थकबाकी  84 लाख 9 हजार,एकुण वसुली   2 कोटी 78 लाख 25 हजार करण्यात आली.​नगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर आणि इतर करांची थकबाकी वसूल करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम राबवण्यात येत होती. यामध्ये मालमत्ता कर भरण्यासंदर्भात नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या. नगर परिषद कडून काही सक्तीचे पावलं उचलत जप्तीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती.

अनेक दिवसांपासून थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या, तर काही ठिकाणी जप्तीची कारवाई देखील प्रस्तावित करण्यात आली होती.कर निरिक्षक महेमुद शहा आणि त्यांच्या पथकातील करी भागातील कर्मचारी अनिल सानप, नारायण चराटे, अब्दुल जमील, सोमदत्त ओवाळकर,मिसाळ यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामामुळे ही मोठी वसुली शक्य झाली आहे. नगरपरिषद कर विभागाने शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी ऐवजी काही सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सुद्धा कर विभाग कार्यालय सुरू ठेवून नागरिकांना कर भरण्यासंदर्भात सोय उपलब्ध करून दिली होती यामुळे रिसोडकरांचा मोठा प्रतिसाद ही लाभला.

नगरपालिकेने (Risod Municipal Council) दिलेल्या सुविधेचा लाभ घेत शहरातील बहुतांश नागरिकांनी आपला कर भरून शहराच्या विकासकामात सहभाग नोंदवला आहे. अद्याप ज्या नऊ टक्के नागरिकांचा कर भरायचा बाकी आहे, त्यांनी कोणतीही कठोर कारवाई टाळण्यासाठी तातडीने आपला कर नगरपालिकेत जमा करावा, असे आवाहन कर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ​कर वसुलीचा हा आकडा वाढल्याने आता शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या कामांना अधिक गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नगरपरिषद कर विभागाकडून नागरिकांना कर भरण्यासंदर्भात जनजागृती करत आव्हान करण्यात आले होते.रिसोडकरांनीही या आव्हानाला प्रतिसाद देत आपल्या कराचा भरणा करून नगरपरिषदेला सहकार्य केले आहे. यामुळेच 91 टक्के वसुली झाली आहे.
-सतीश शेवदा, मुख्याधिकारी न प रिसोड

नगरपरिषद (Risod Municipal Council) कर विभागाने करवसुली संदर्भात उत्कृष्ट नियोजन केले होते. कर विभागातील कर्मचाऱ्यांनी चोखरीत्या सदर काम बजावले. यामुळेच नगरपरिषद कर विभागाने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. उर्वरित नागरिकांनीही आपला करणाचा वेळेच्या आत भारना करुन लागणारे व्याज टाळावे.
-मेहमूद शहा कर निरीक्षक न प रिसोड

संबंधित सामग्री

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026
नेपाळमध्ये पुराचा कहर; वाहून गेलेली बँकेची तिजोरी फोडून ९२ लाखांची रोकड लंपास

नेपाळमध्ये पुराचा कहर; वाहून गेलेली बँकेची तिजोरी फोडून ९२ लाखांची रोकड लंपास

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराच्या तडाख्यात बँकेची तिजोरीच वाहून गेल्याची घटना घडली.

Aug 29, 2026
उदगीरमध्ये २१४३ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची खळबळ; खोट्या प्रमाणपत्राद्वारे परदेशात निधी पाठविल्याचा आरोप

उदगीरमध्ये २१४३ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची खळबळ; खोट्या प्रमाणपत्राद्वारे परदेशात निधी पाठविल्याचा आरोप

परदेशी निधी पाठविण्याच्या व्यवहारात खोट्या प्रमाणपत्राचा वापर करून परदेशात पाठविण्यास चुकीच्या पद्धतीने सहाय्य केल्याचा गंभीर प्रकार उदगीरमध्ये समोर आला आहे.

Aug 22, 2026
मंदिराच्या दानपेटीची चोरी उघडकीसदोन मोटारसायकलीही हस्तगत

मंदिराच्या दानपेटीची चोरी उघडकीसदोन मोटारसायकलीही हस्तगत

Temple Donation Box: केदारनगर देवमाळी येथील श्री गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास करण्यासह मोटारसायकल चोरीच्या घटनांचा परतवाडा पोलिसांच्या डी.बी. पथकाने छडा लावला आहे.

Aug 20, 2026
पोलिसांच्या कामगिरीत १८ लाखांचे १०१ मोबाईलचा लावला शोध; दै. देशोन्नतीचा अंदाज तंतोतंत ठरला खरा

पोलिसांच्या कामगिरीत १८ लाखांचे १०१ मोबाईलचा लावला शोध; दै. देशोन्नतीचा अंदाज तंतोतंत ठरला खरा

Hingoli Police Action: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगोली पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेले १०१ अँड्रॉइड मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केल्याची घोषणा केली आहे.

Aug 16, 2026