रिसोड काँग्रेस पक्ष

सुशिक्षित आणि कल्पक युवा शक्तीचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Risod Congress Party: लिंगा कोतवाल येथील विविध क्षेत्रांतील सुशिक्षित तरुण, डॉक्टर, इंजिनिअर आणि आदर्श शेतकरी अशा कर्तृत्ववान युवक मित्रमंडळींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश

सुशिक्षित आणि कल्पक युवा शक्तीचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Risod Congress Party

 

आ. अमित झनक यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास

रिसोड (Risod Congress Party) : तालुक्यातील लिंगा कोतवाल येथील विविध क्षेत्रांतील सुशिक्षित तरुण, डॉक्टर, इंजिनिअर आणि आदर्श शेतकरी अशा कर्तृत्ववान युवक मित्रमंडळींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे आमदार मा. अमित सुभाषराव झनक यांच्या विकासकामांवर आणि दूरदृष्टी नेतृत्वावर विश्वास ठेवून या युवकांनी हा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाची सर्वसमावेशक विचारधारा आणि आ. झनक यांच्या विकासाच्या व्हिजनला पाठबळ देण्यासाठी या सुशिक्षित युवकांनी सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले.

​आ. अमित झनक यांनी नवप्रविष्ट सर्व युवकांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या प्रत्येक विधायक उपक्रमात सदैव खंबीरपणे पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. गावातील डॉक्टर, तंत्रज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांच्या या प्रवेशामुळे लिंगा कोतवाल व परिसरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून पक्षामध्ये नवा उत्साह संचारला आहे. या (Risod Congress Party) पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी परिसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लिंगा कोतवाल गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टैग्स: Risod Congress Party