Pune Flood

आषाढी वारी 2026: पुण्यात पालखी सोहळ्यापूर्वी वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कुठे वळवला जाणार ट्रॅफिक?

पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदीमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.

आषाढी वारी 2026: पुण्यात पालखी सोहळ्यापूर्वी वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कुठे वळवला जाणार ट्रॅफिक?

Pune Flood

8 ते 12 जुलैदरम्यान विशेष वाहतूक नियोजन; जड वाहनांवर निर्बंध, 33 बाह्य आणि 132 अंतर्गत डायव्हर्जन पॉइंट्सची व्यवस्था

आषाढी वारी 2026 निमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पुण्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी 8 जुलै ते 12 जुलै 2026 या कालावधीत विशेष वाहतूक आराखडा जाहीर केला आहे. 8 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून 12 जुलै रात्री 11 वाजेपर्यंत शहरात विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध आणि पर्यायी मार्ग लागू राहणार आहेत.

पुणे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या 9 जुलै रोजी पुण्यात प्रवेश करतील. 10 जुलै रोजी पालख्यांचा मुक्काम पुण्यात असेल, तर 11 जुलै रोजी पालख्या सोलापूर रोड आणि सासवड रोडमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करतील. या काळात लाखो वारकरी शहरात दाखल होणार असल्याने वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे..

यामुळे ओव्हरलोड ट्रक, डंपर, काँक्रीट मिक्सर आणि इतर अनावश्यक जड वाहनांना 8 जुलैपासून 11 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पालखी मार्गावरील ठरावीक रस्त्यांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल टँकर तसेच अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

9 जुलै रोजी जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि आळंदी रोडवरून पेट्रोल व डिझेल टँकरना प्रवेश दिला जाणार नाही. 10 जुलै रोजी भवानी पेठ, नाना पेठ आणि रास्ता पेठ परिसरात इंधन पुरवठा करणाऱ्या टँकरना शहरात प्रवेशासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. तसेच 11 जुलै रोजी सोलापूर महामार्गावरून पेट्रोल आणि डिझेल टँकरची वाहतूकही बंद राहणार आहे.

पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताची आखणी केली आहे. यामध्ये एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, एक पोलीस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त/उपविभागीय पोलीस अधिकारी, 14 पोलीस निरीक्षक, 57 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच 1,120 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 33 बाह्य (External) आणि 132 अंतर्गत (Internal) डायव्हर्जन पॉइंट्स तयार करण्यात आले आहेत. 11 जुलै रोजी पहाटे 2 वाजल्यापासून पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल. दोन्ही पालख्या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत हा वाहतूक आराखडा लागू राहणार आहे.

या काळात संत कबीर चौक, रामोशी गेट, सेव्हन लव्हज चौक, गोळीबार मैदान, मम्मादेवी चौक, वानवडी, हडपसर, सोलापूर रोड आदी प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू राहतील. तसेच दिवे घाट आणि बोपदेव घाट या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पालखी मार्गावरील रस्ते टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रवासाचे नियोजन करताना वाहतूक विभागाच्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळता येईल.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026