डॉ. प्रज्ञा सातव

केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीवर आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांची निवड

Dr. Pragya Satav: केंद्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीसाठी उच्चस्तरीय समिती तयार केली, ज्यात आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांना सदस्य म्हणून निवडले गेले आहे.

केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीवर आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांची निवड

Dr. Pragya Satav

हिंगोली (Dr. Pragya Satav) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आगामी २०० वी जयंती २०२६ ते २०२८ पर्यंत  राष्ट्रव्यापी स्तरावर साजरी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशपातळीवर १२६ सदस्यांची एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित समितीत सदस्य म्हणून आ.डॉ. प्रज्ञाताई सातव (Dr. Pragya Satav) निवड करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा घराघरात पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यासाठी तसेच दोन वर्षांच्या या स्मरणोत्सवांतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे संचलन आणि अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे व शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समता या विषयांवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाची आखाणी हि समिती करणार असून, या समितीत माजी राष्ट्रपती, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि देशातील सर्वोच्च धोरणकर्ते, पद्मश्री पुरस्कारार्थी, विविध तज्ज्ञ व प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे.

फुले दाम्पत्याचा समतेचा विचार देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी या माध्यमातून कटिबद्ध राहणार असल्याचे आ. डॉ. प्रज्ञाताई सातव (Dr. Pragya Satav) यांनी सांगितले व या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार त्यांनी मानले.

संबंधित सामग्री

मुंबईतील शेतकरी आंदोलनाचा परिणाम; कर्जमाफी निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत

मुंबईतील शेतकरी आंदोलनाचा परिणाम; कर्जमाफी निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत

Mumbai loan waiver Andolan: मुंबईतील विधानभवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने यापुर्वीच जाहीर

Jul 12, 2026
मुंबई आंदोलनाचा विजय; कर्जमाफी निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत

मुंबई आंदोलनाचा विजय; कर्जमाफी निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत

Mumbai loan waiver Andolan: मुंबईतील विधानभवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

Jul 10, 2026
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार

CM Devendra Fadnavis: नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशी करण्यात येत आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार

Jul 10, 2026
११५ वर्षांची प्रतीक्षा संपली! खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहण मंजुरी

११५ वर्षांची प्रतीक्षा संपली! खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहण मंजुरी

 खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या निर्मितीची तब्बल ११५ वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Jun 02, 2026
हिंगोली शहरातही होणार ऐतिहासिक भिडेवाडा चित्ररथाचे आगमन

हिंगोली शहरातही होणार ऐतिहासिक भिडेवाडा चित्ररथाचे आगमन

Bhidewada Chitrarath: हिंगोली शहरात लवकरच ऐतिहासिक भिडेवाडा चित्ररथाचे आगमन होणार आहे, ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा प्रसार होणार आहे.

Apr 30, 2026