पोलीस वाहन अडविली प्रकरण

पार्डी पोहकर येथे पोलीसांचे वाहन अडवून शासकीय कामात अडथळा; ३५ जणांवर गुन्हा दाखल

Police Vehicle Stalled Case: पार्डी पोहकर येथे गणेशोत्सवामुळे जमावबंदी आदेश असताना काहीजणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस वाहन अडविल्या प्रकरण

पार्डी पोहकर येथे पोलीसांचे वाहन अडवून शासकीय कामात अडथळा; ३५ जणांवर गुन्हा दाखल

Police Vehicle Stalled Case

सेनगाव (Police Vehicle Stalled Case) : तालुक्यातील पार्डी पोहकर येथे गणेशोत्सवामुळे जमावबंदी आदेश असताना काहीजणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस वाहन अडविल्या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात ३५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  २० सप्टेंबर रोजी सकाळी १०.४० ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. गणपती उत्सवाच्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी हिंगोली यांनी जमावबंदी आदेश लागू केला असताना आरोपींनी शासकीय कामकाजात हस्तक्षेप करून सेनगावकडे येण्यास प्रतिबंध केला. या प्रकरणात सेनगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग सुखदेव पोहकर, अभिमान किसन पोहकर, रवि दामोदर पोहकर (सरपंच), त्र्यंबक किसन पोहकर, जनार्धन प्रल्हाद पुरी, प्रभाकर रामजी पोहकर, समाधान भानुदास पोहकर, राहुल मानिक मुडे, सुरजसिंग चव्हाण, किसन नारायण पोहकर, रामा सटवा पोहकर, अमोल किशन पुरी, धारु उत्तमराव पोहकर, माधव काशीराम मुडे, दिपक दयाळु पोहकर, राहुल मधुकर पोहकर, विशाल दिलीप पोहकर, अभिमान उत्तमराव पोहकर, राजु मनोहर पोहकर, गोपाल रुस्तुम पोहकर सर्व रा. पार्डी पोहकर तसेच इतर १० ते १५ अनोळखी इसम मिळून एकूण ३५ जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.