श्रीरामाच्या जयघोषाने उपराजधानी दुमदुमली

श्रीराम नवमी जन्मोत्सवाच्या पर्वावर शहरात प्रभू श्रीरामाच्या जयघोषात उपराजधानीत श्री पोद्दारेश्वर राम मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

श्रीरामाच्या जयघोषाने उपराजधानी दुमदुमली

Poddareshwar Temple

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

नागपूर (Poddareshwar Temple) : श्रीराम नवमी जन्मोत्सवाच्या पर्वावर शहरात प्रभू श्रीरामाच्या जयघोषात उपराजधानीत श्री पोद्दारेश्वर राम मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यंदा साठ वर्ष पूर्ण झालेल्या मध्य नागपुरातील ऐतिहासिक शोभायात्रेतील सुशोभित रथावरील श्रीरामाच्या मनोवेधक दर्शनाने हजारो भाविकांचे नेत्र सुखावले. तसेच पश्चिम नागपूर येथेही प्रभू श्रीरामचंद्राची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. एकूणच संपूर्ण नागपूर शहर राममय झाल्याची अनुभूती आली.

आकर्षक चित्ररथांचे विशेष आकर्षण

श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात शोभायात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नीता ठाकरे, पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, शहरातील सर्व आमदार, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, महापालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह गणमान्य व्यक्तींनी रथावर विराजित प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि श्री हनुमानजींच्या श्रीविग्रहांचे पूजन करून भगवंताला फळांची माला अर्पण केली.

लेझिम, डम्बेल्सच्या कवायतींचे दर्शन

शोभायात्रेचा शुभारंभ पोद्दारेश्वर राम मंदिर येथून झाला. तेथून मेयो हॉस्पिटल चौक, हंसापुरी, गांधीबाग, शहीद चौक इतवारी, चितार ओळ चौक, महाल, गांधीगेट, टिळक पुतळा, आग्याराम देवी चौक, कॉटन मार्केट, आनंद टॉकीज, मुंजे चौक, झांसी राणी चौक, व्हेरायटी चौक, सीताबर्डी मेनरोड, लोखंडी पूल मानस चौक, रेल्वे स्टेशन, रामझुलामार्गे परत पोद्दारेश्वर राम मंदिर येथे पोहोचली.

मार्गावर रांगोळी अन् ठिकठिकाणी पुष्पवर्षाव

शोभायात्रेत एकूण ९३ नयनरम्य चित्ररथ, आकर्षक दृष्य, चित्तथरारक तलवारबाजी, दांडपट्ट्यासह लेझिम, डम्बेल्स च्या कवायतींचे मुख्य आकर्षण होते. ठिकठिकाणाहून भजन मंडळांद्वार संकीर्तन आणि महिला भजन मंडळांचे भजन ज्येष्ठांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेत प्रामुख्याने इस्कॉन, श्री दुर्गा जस महिला संकीर्तन मंडळासह कर्णमधूर धार्मिक समालोचन मनाला प्रसन्नता वाटत होती. या व्यतिरिक्त लोकनृत्य, स्केटिंग करताना लहान मुले आणि देव नृत्याचे दर्शन मनोवेधक ठरले. सोबतच १०८ मंगल कलशधारी कुमारिका शोभायात्रेत मार्गक्रमण करीत होत्या.

चौकांमध्ये भगवान श्रीरामाचा जयघोषासह बॅड पथक आणि ढोलताशाच्या गजराने युवा भक्तांमध्ये उमंग भरली होती. शोभात्रेच्या स्वागतासाठी चौकाचौकात स्वागतद्वार उभारण्यात आले होते. विविध ठिकाणी प्रसाद, चना, शीतल जल, शीतपेय आणि ताक वितरण करण्यात येत होते. शोभायात्रेच्या मार्गांवर आणि चौकांमध्ये रोशनाई करण्यात आली होती. शोभायात्रेच्या स्वागतासाठी आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी हजारो बांधवांची रस्त्यावर तोबा गर्दी होती.

कडक पोलिस बंदोबस्त

शोभायात्रेदरम्यान शहरात ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मार्गव्यवस्थेसह इतर आवश्यक सुविधांकरिता चोवीस हजारांवर स्वयंसेवक कार्य करीत होते. शोभायात्रा शांततेत पार पडण्यासाठी भाविकांनीदेखील सर्वधर्मसमभावाचा परिचय दिला.

सर्वधर्मसमभावाचा संदेश

श्री पोद्दारेश्वर श्रीराम जन्मोत्सव शोभयात्रेदरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम समुदायातर्फे मोमीनपुरा प्रवेशद्वाराजवळ फुलांचा वर्षाव करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. अशाप्रकारे शोभायात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी शोभायात्रेचे स्वागत करून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.

बँड पथक आणि ढोलताशाचा निनाद

भगवान श्रीरामाच्या शोभायात्रेदरम्यान बँडपथक आणि ढोलताशाच्या गजराने संपूर्ण परिसर निनादून गेला होता. एकीकडे श्रीरामाचा जयघोष होत असतानाच भजन आणि संकीर्तनादी कार्यक्रमांनी वातावरण धार्मिक झाले होते. चित्तथरारक परंपरागत ऐतिहासिक तलवारबाजी आणि दांडपट्टा लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकाणी प्रेक्षकांना प्रसादासह, चना, शीतल जल, शीतपेय, मठ्ठा, मिठाईचे वाटप करण्यात आले. आकर्षक रोशनाईने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

चौकाचौकांत स्वागतद्वार आणि आकर्षक रांगोळी   

शोभायात्रेच्या मार्गावर चौकाचौकात विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने भव्य स्वागतद्वार उभारून लांबचलांब विद्युत दिव्यांची रोशनाई करण्यात आली होती. शोभायात्रेच्या स्वागतासाठी चौकांसह शोभायात्रेच्या मार्गांवर रंगबिरंगी रांगोळी रेखाटल्या होत्या. चौकातच भगवान श्रीरामाची प्रतिमा आकर्षकरित्या प्रेक्षकांचे लक्ष वेधत होते. तसेच भव्य तैलचित्र उभारून चौकाचे सौंदर्य वाढविण्यात आले होते.

 

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026