मोदींच्या वाढदिवसानिमित्त बिडगावमध्ये महाआरती सोहळा
बिडगाव (PM Narendra Modi Birthday) : भारतीय जनता पार्टी, बिडगाव नगरपंचायतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’ आणि महाआरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. झेंडा चौक गणेशोत्सव मंडळ परिसर, वॉर्ड क्रमांक 14, प्रधानमंत्री आवास योजना, खासरा क्रमांक 63, नगरपंचायत बिडगाव येथे हा सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवर आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोभावे महाआरती केली. त्यानंतर ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची विकास आणि प्रगतीची वाटचाल अखंड सुरू राहावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या (PM Narendra Modi Birthday) कार्यक्रमास नागपूर ग्रामीण (रामटेक) जिल्हामंत्री रमेश चिकटे, बिडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष वीरूभाऊ जमगडे, कामठी तालुकाध्यक्ष सचिन घोडमारे, सभापती निकेश कातुरे, संतोष तिजारे, कामठी तालुका महामंत्री आशिष मल्लेवार, भाजयुमो अध्यक्ष राहुल बोढारे, सभापती प्रीतम बोकडे, भारतीताई देवगडे, प्रियाताई मल्लेवार, नगरसेवक नितीन चकोले, अजित जमगडे, अजय बिसेन यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
तसेच भाजपा बिडगाव अध्यक्ष पुंडलिक कुर्वेकर, महिला अध्यक्ष सपनाताई दांडवे, भाजयुमो अध्यक्ष रजत पराते, झेंडा चौक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नारायण डहरवाल, सचिव अक्षय इंगळे यांच्यासह ज्योती फुंडे, सुषमा बोकडे, कुंदा चिंचमाळकर, शुभांगी इंदूरकर, किरण गुप्ता, शिल्पा बोरकर, प्रशांत बोरकर, प्रदीप चौधरी, सचिन भोयर, रवींद्र डेकाटे, राजू देवगिरकर, भिकामलाल धुवारे, आशिष रवी, संजय अनासने, प्रशांत तुराळे, पारस पगाडे, योगेश माथने आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रसेवा, विकास आणि ‘विकसित भारत’ या संकल्पाला बळ देण्याचा संदेश देण्यात आला.