पेट्रोलपंपचालक , कंपन्यांच्या वादात  जिल्ह्यात पेट्रोलची टंचाई

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असतांनाच आता गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पेट्रोलपंपचालक , कंपन्यांच्या वादात  जिल्ह्यात पेट्रोलची टंचाई

Petrol Shortage

जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर लागल्या पेट्रोल नसल्याच्या पाट्या

गडचिरोली : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असतांनाच आता गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामागे आखाती युद्धाचे कारण नसुन पेट्रोलपंपचालक व कंपन्यांचा आपसी वाद असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.

आखाती युद्ध सुरू झाल्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंपावर पेट्रोलचा पुरवठा ठप्प पडत आहे. शनिवारपासून मात्र गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पेट्रोलची टंचाई प्रकर्षाने जाणवु लागली. गडचिरोली शहरातील  एक-दोन पेट्रोपंप वगळता उर्वरीत सर्व पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध नव्हते. यामुळे दुचाकीस्वार तसेच कारचालकांनी पेट्रोलपंपावर धाव घेतली. चंद्रपूर मार्गावरील पेट्रोलपंपावर होणारी गर्दी लक्षात घेता पेट्रोलपंप चालकांनी २०० रूपयापेक्षा जास्त पेट्रोल देणे बंद केले होते. शहरातील बट्टुवार पेट्रोलपंपावर वाहनचालकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र या पेट्रोलपंपावरीलही पेट्रोल संपल्याने अनेक वाहनचालकांनी आपली वाहने पेट्रोलपंपावरच ठेऊन दिल्याचे निदर्शनास येत  होते.

पेट्रोल अभावी अनेकांची कामे खोळंबली होती. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पेट्रोलच्या तुटवड्याचा युद्धाशी काहीही सबंध नसल्याचे स्पष्ट केले. यापुर्वी पेट्रोल पुरवठा करणार्‍या कंपन्या पेट्रोलपंप चालकांना उधारीवर पेट्रोल देत होत्या. मात्र आता त्यांनी उधारीवर पेट्रोल देणे बंद केले असुन जेवढे पैसे भराल तेवढाच पेट्रोलचा पुरवठा होईल असे धोरण स्वीकारले आहे. यामुळे पेट्रोलपंप चालकांचा पुरवठा खंडीत झाला होता. येत्या एक-दोन दिवसात जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा पुरवठा सुरळीत होईल असेही जिल्हा पुरवठा अधिकारी पवार यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

Jio-BPच्या काही पंपांवर डिझेल खरेदी 50 लिटरपुरती मर्यादित; Nayara Energyवरही निर्बंध. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवर मात्र सध्या विक्री सुरळीत.

Sep 24, 2026
मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

मूलभूत सुविधा पुरविण्या चे मागणीसाठी ढोल बजाओ आंदोलन

Dhol Bajao Andolan : शहरातील वाढती अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा, बंद पथदिवे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि बंद पडलेल्या उद्यानांच्या प्रश्नांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहर..

Aug 13, 2026
औषधे नसल्याने संताप! उपजिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाच्या वडिलांचे ‘भीक मागो’ आंदोलन

औषधे नसल्याने संताप! उपजिल्हा रुग्णालयाच्या दारात रुग्णाच्या वडिलांचे ‘भीक मागो’ आंदोलन

Bhik Mago Andolan: पजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच, याचा निषेध म्हणून एका रुग्णाच्या वडिलांनी चक्क ‘भीक मागो’ आंदोलन

Aug 07, 2026
शुद्ध पेट्रोलच्या शोधात वाहनचालक;  नायरा पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी!

शुद्ध पेट्रोलच्या शोधात वाहनचालक;  नायरा पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी!

Nayara Petrol Pump: E20 समस्यामुळे अनेक वाहने बंद पडत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असुन वाहनात पेट्रोल भरण्यासाठी चालक नायरा पंप गाठून पेट्रोल भरणा करत आहे. 

Jul 27, 2026
रामवाडी फिडर वरील शेतकऱ्यांना सिंगल फेज सुरू करण्याची मागणी

रामवाडी फिडर वरील शेतकऱ्यांना सिंगल फेज सुरू करण्याची मागणी

Ramwadi Power Supply: रामवाडी फीडरवर रात्रीच्या सिंगल फेज वीज पुरवठा बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अंधारामुळे धोक्याचा समस्या होत आहे. चोरांचा धोका अधिक वाढ आहे

Jun 23, 2026