पातूर (Patur Municipal Council Election) : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या पातूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२६ अंतर्गत दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संतोष येवलीकर यांच्या स्वाक्षरीने विधीग्राह्य ठरलेल्या (वैध) उमेदवारांची अंतिम प्रभागनिहाय यादी (नमुना-४) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार, अध्यक्ष पदासह सर्व १० प्रभागांमधील जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने आता शहरातील राजकीय वातावरणात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
या प्रसिद्ध झालेल्या अधिकृत यादीनुसार प्रभागनिहाय वैध उमेदवारांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
अध्यक्ष पद (सर्वसाधारण प्रवर्ग)
पातूर नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी एकूण ७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुभाष पांडुरंग बोचरे (शिवसेना-शिंदे गट), सचिन समाधान ढोणे (भाजपा), हिदयात खान रूम खान व नेमत खान रूम खान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सैय्यद बुरहान सैय्यद नबी (विकास योद्धा मंच) आणि सलाबतखा हफिजउल्लाखॉ व ख्वाजा वाजीद अली ख्वाजा आरीफ (अपक्ष) यांचा समावेश आहे.
प्रभागनिहाय वैध उमेदवारांची यादी:
प्रभाग क्रमांक १:
जागा 'अ' (अनुसूचित जाती-महिला): रुपाली सुरवाडे (अपक्ष), पल्लवी सुरवाडे (विकास योद्धा मंच), वैशाली गोतरकार (भाजपा), शितल पोहरे (काँग्रेस), प्रिया सुरवाडे (काँग्रेस-पर्यायी), स्वाती उपर्वट (अपक्ष) आणि मोनिका सुरवाडे (शिवसेना).
जागा 'ब' (सर्वसाधारण):
मोहम्मद मुज्जमील (विकास योद्धा मंच), मोहम्मद मुबीन (अपक्ष), नवीन करंगाळे (भाजपा), मो. शाकीर व मो. फैजान (काँग्रेस) आणि अब्दुल्ला खान (शिवसेना).
प्रभाग क्रमांक २:
जागा 'अ' (सर्वसाधारण): आनंद तायडे (शिवसेना-उबाठा), संतोष उगले (अपक्ष), सुरेश फुलारी (भाजपा), दिलीप बगाडे (अपक्ष) आणि अंबादास देवकर (शिवसेना).
जागा 'ब' (सर्वसाधारण महिला): अलका उगले (शिवसेना-उबाठा), अश्विनी पाटील (भाजपा), सिमाली पाटील (भाजपा-पर्यायी), वनिता बगाडे (अपक्ष) आणि आशा फुलारी (शिवसेना).
प्रभाग क्रमांक ३:
जागा 'अ' (नागरिकांचा मागास प्रवर्ग): कैलास उगले (अपक्ष), अजय पाटील (शिवसेना-उबाठा), राजु उगले व गजानन उगले (भाजपा), चंद्रकांत बारतासे (अपक्ष), शेख नासीर (विकास योद्धा मंच) आणि किरणकुमार निमकंडे (शिवसेना).
जागा 'ब' (सर्वसाधारण महिला): पूनम बैस (अपक्ष), निशा निखाडे (शिवसेना-उबाठा), तुळसाबाई गाडगे (भाजपा), नाजेमाबी शेख मुख्तार (काँग्रेस) आणि हमीदाबी हुसेन शहा (विकास योद्धा मंच).
प्रभाग क्रमांक ४:
जागा 'अ' (नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला): निशांत परविन (अपक्ष), पुजा बारतासे (अपक्ष), आलिया अमरीन (विकास योद्धा मंच), वर्षा बगाडे (भाजपा), सुनिता वाघमारे (काँग्रेस), शोभा तोंडे (अपक्ष) आणि हमिदाबी हुसेन शाह (विकास योद्धा मंच-पर्यायी).
जागा 'ब' (सर्वसाधारण): शेख नईम (विकास योद्धा मंच), संदीप तायडे (भाजपा), साद अहमद खान व फ़ैसल खान (काँग्रेस) आणि शेख वसीम (शिवसेना).
प्रभाग क्रमांक ५:
जागा 'अ' (नागरिकांचा मागास प्रवर्ग): प्रभुदास बोंबटकार (भाजपा), सै. वसीमउद्दीन (विकास योद्धा मंच व अपक्ष अशा दोन्ही अर्जांसह वैध), मोहम्मद अलीमोद्दीन (अपक्ष), हरीष बोचरे (शिवसेना), मो. इसामोद्दीन व मो. रेहानोद्दीन (काँग्रेस).
जागा 'ब' (सर्वसाधारण महिला): वैशाली निकम (भाजपा), निलोफर शाहीन व बुशरा अंजुम (विकास योद्धा मंच), सदफ़ परवीन व रुमाना तबस्सूम (काँग्रेस), नलीनी बोंबटकार (अपक्ष) आणि स्वाती भगत (शिवसेना).
प्रभाग क्रमांक ६:
जागा 'अ' (नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला): मुमताज बानो (काँग्रेस-पर्यायी), सबा फिरदोस (काँग्रेस), शाजीया परवीन (विकास योद्धा मंच) आणि प्रगती ढोणे (भाजपा).
जागा 'ब' (सर्वसाधारण): असलम खान (शिवसेना-शिंदे गट), खा. खालीलउर रेहमान व ख्वाजा नईमउर्र रहेमान (काँग्रेस), कमरूज्जमा खान व गौसिया बी खान (विकास योद्धा मंच), नेमत खान (अपक्ष) आणि परशराम बंड (भाजपा).
प्रभाग क्रमांक ७:
जागा 'अ' (नागरिकांचा मागास प्रवर्ग): शाहीन परवीन (काँग्रेस), सिमरन परवीन (शिवसेना-शिंदे गट), अनिकेत उमाळे (भाजपा), मोहम्मद फैज व शेख रिजवान (विकास योद्धा मंच) आणि सबिहा नसरीन (काँग्रेस-पर्यायी).
जागा 'ब' (सर्वसाधारण महिला): असमा तबस्सुम (विकास योद्धा मंच), तबस्सुम परवीन (काँग्रेस), ज्योती गाडगे (भाजपा), सनोबर महेक (काँग्रेस-पर्यायी), शिरीन बानो (शिवसेना-शिंदे गट) आणि सरवत जबिन (विकास योद्धा मंच).
प्रभाग क्रमांक ८:
जागा 'अ' (सर्वसाधारण): सैय्यद अनवर (विकास योद्धा मंच व अपक्ष दोन्ही अर्जांसह वैध), ख्वाजा वाजीद अली (अपक्ष), शेख असिफ (अपक्ष), सैय्यद नईम व सैय्यद सईद (काँग्रेस), आरिफ खान (शिवसेना-शिंदे गट), सैय्यद मुजम्मील हुसैन (विकास योद्धा मंच) आणि संदीप सौंदळे (भाजपा).
जागा 'ब' (सर्वसाधारण महिला): सलमा परवीन (भाजपा), आफिया खानम व शाईस्त फिरदोस (काँग्रेस), जाकेरा बी व मीना बुलबुले (विकास योद्धा मंच).
प्रभाग क्रमांक ९:
जागा 'अ' (नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला): कांचन निमकंडे (भाजपा), सुमैय्या सदाफ (काँग्रेस), असनीय महरीन व संदिया अमरीन (विकास योद्धा मंच).
जागा 'ब' (सर्वसाधारण): सुमित हाळके (भाजपा), कैसर जाहा (विकास योद्धा मंच), मोहम्मद एहसानदानीश व मो. महेताब (काँग्रेस).
प्रभाग क्रमांक १०:
जागा 'अ' (अनुसूचित जाती): बाबुराव गवई (विकास योद्धा मंच), ममता खोडे (काँग्रेस) आणि शिवचरण घोडे (भाजपा).
जागा 'ब' (सर्वसाधारण महिला): हुसेना बीं व गुलनाज परवीन (काँग्रेस), शहनाज खान (विकास योद्धा मंच) आणि सविता बारोकर (भाजपा).
पर्यायी उमेदवारांची भूमिका ठरणार महत्त्वपूर्ण
अनेक प्रभागांमध्ये मुख्य राजकीय पक्षांनी खबरदारी म्हणून 'पर्यायी उमेदवार' (डमी उमेदवार) उभे केले होते, त्यांचेही अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. आता अर्ज मागे घेण्याच्या मुदतीमध्ये कोणते उमेदवार आपले अर्ज मागे घेतात आणि प्रत्यक्षात कोण रिंगणात उरते, याकडे संपूर्ण (Patur Municipal Council Election) पातुरवासीयांचे लक्ष लागले आहे. या छाननी प्रक्रियेनंतर शहरातील चौक-चौकांत आणि सोशल मीडियावर राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे.
नामनिर्देशन पत्रांच्या छाननीनंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध; राजकीय हालचालींना वेग!
Patur Municipal Council Election: पातूर नगरपरिषद निवडणुकांमध्ये ७ उमेदवारांची वैध यादी जाहीर झाली. अध्यक्ष पदासह १० प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार नामांकित केले
Patur Municipal Council Election
संबंधित सामग्री
जिल्ह्यात रिक्त असलेल्या तीन पैकी हिंगोली न.प. व औंढा ना. नगर पंचायतमध्ये मुख्याधिकार्यांची नियुक्ती
Hingoli Municipal Council: हिंगोली नगर पालिका व औंढा नगर पंचायत मध्ये रिक्त पदावर दोन महिन्यांची प्रतिक्रिया मागण्यात आली. शासनाने मुख्याधिकार्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.
हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसच्या जंम्बो कार्यकारिणीत शहरी भागावर अन्याय; कार्यकर्त्यांत नाराजी
Hingoli District Congress: काँग्रेसच्या जिल्ह्यादरम्यान कॅबिनेट मॉडेलचा दबदबा सापडत असतानाही हिंगोलीच्या शहरातील पदाधिकारींचा समावेश नकारवण्यात आला आहे.
कन्हान-सिहोरा येथील आरक्षित जागा कायम ठेवण्यात यावी; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा
Kanhan-Pipri Municipal Council: नगरपरिषद कन्हान-पिपरी हद्दीतील मौजा कन्हान-सिहोरा येथील सर्वे क्रमांक १०२, १०३ व १०४ मधील आरक्षित जागांचे आरक्षण कायम ठेवावे तसेच नगरपरिषदच्या मासिक सभेतील ठराव क्रमांक
पातुर नगरपरिषद निवडणूक निकाल; हिदायत खा उर्फ इद्दु पहलवान नगराध्यक्षपदी
Patur Municipal Council Election: पातुर नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवार हिदायत खा उर्फ इद्दू पहलवान विजयी झाला आहे. मतदानाच्या दिवशी पातूर शहरात उत्साहाची वातावरण
पातुरात लोकशाहीचा उत्सव; नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आज मतदान
पातुर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, २० जून २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.