जिल्हा परिषद शाळा

परभणीत वादळी वार्‍याने उडाले शाळेचे पत्रे; खाजगी घरात भरतात वर्ग

Zilla Parishad School: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वादळामुळे उडून गेल्या पतऱ्यांमुळे मोठे नुकसान झाले. शाळेच्या छतावर उडलेल्या लखंडी पतऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा मार्ग बाधित

परभणीत वादळी वार्‍याने उडाले शाळेचे पत्रे; खाजगी घरात भरतात वर्ग

Zilla Parishad School

 

पाथरी तालुक्यातील सारोळा (खु) येथे  विद्यार्थांची अडचण
जि.प .सदस्य अजिंक्य नखाते यांच्याकडून स्वखर्चाने दुरुस्ती

परभणी (Zilla Parishad School) : पाथरी  महिन्याभरापूर्वी झालेल्या वादळी वार्‍यात  तालुक्यातील सारोळा (खु) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांवरील लोखंडी पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अडचण निर्माण झाली असून सध्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग ग्रामस्थ शिवाजी खंडागळे यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत पर्यायी स्वरूपात भरविण्यात येत आहेत.

वादळी वार्‍यामुळे शाळेच्या छताचे पत्रे उडून गेल्याने व त्यानंतर पावसामुळे वर्गखोल्यातील असणारे काही शैक्षणिक साहित्याचेही नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. घटनेनंतर बाजार समितीचे माजी सभापती अनिलराव नखाते यांनी शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. यानंतर जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य नखाते यांनी स्वत: लक्ष घालून शाळेच्या दुरुस्तीचे काम स्वखर्चातून सुरू केले आहे.  

सुस्थितीत वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न
 सारोळा (खु) येथील शाळेचे वादळी वार्‍यात नुकसान झाले आहे . सध्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेच्या दुरुस्तीचे काम स्वखर्चातून तातडीने सुरू केले आहे. हे काम लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांना  सुस्थितीत वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
-अजिंक्य नखाते, जिल्हा परिषद सदस्य

संबंधित सामग्री

बुलेटची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू, एक गंभीर

बुलेटची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू, एक गंभीर

Bullet Bike Accident: १३ जुलै सायंकाळी पाथरीच्या तालुक्यातील बुलेट चालकाने दुसऱ्याचे दुचाकीवर धडक दिली. अपघातामुळा एका दुचाकीवर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि गम्भीर जखम झाली.

Jul 14, 2026