गंगाखेड कडकडीत बंद

परभणीत अत्यावश्यक सुविधा वगळता गंगाखेड शहर कडकडीत बंद

Gangakhed Shutdown: परभणीतील गंगाखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिल्लीतील लाठीच्या हल्ल्यालाच विरोध करण्यासाठी महारत बांधली. हे बंद शहरात व्यवसायिक व व्यापारी कडक प्रतिसाद

परभणीत अत्यावश्यक सुविधा वगळता गंगाखेड शहर कडकडीत बंद

Gangakhed Shutdown

 

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...!

परभणीत (Gangakhed Shutdown) : गंगाखेड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने दिल्लीतील लाठी हल्ला घटनेच्या निषेधार्थ गुरुवार रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.

दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी गुरुवार २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला गंगाखेड शहरातील व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने किरकोळ फळे व भाजीपाला विक्री तसेच अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती.

बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. या दरम्यान शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीसह अन्य समविचारी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमले व त्यांनी यावेळी दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. (Gangakhed Shutdown) बंद दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित सामग्री

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; जालना, बीड, परभणी आणि लातूरमध्ये उद्या कडकडीत बंद

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; जालना, बीड, परभणी आणि लातूरमध्ये उद्या कडकडीत बंद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण पाचव्या दिवशीही कायम आहे.

Sep 02, 2026
दिल्लीतील कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मानोरा शहर कडकडीत बंद! 

दिल्लीतील कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मानोरा शहर कडकडीत बंद! 

Manora Shut Down: मानोरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध आंबेडकर समावेशी संघटनांनी आमंत्रण दिले असून शांतीपूर्ण पद्धतीने आंदोलनाला पाठिंबा देण्यावर ठरवले

Jul 23, 2026
उद्याच्या महाराष्ट्र बंदला व्ही. एस. पँथर्सचा पाठिंबा!

उद्याच्या महाराष्ट्र बंदला व्ही. एस. पँथर्सचा पाठिंबा!

Maharashtra Bandh 2026: दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनावर दिल्ली पोलिसांच्या वतीने अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंद

Jul 22, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचा बेमुदत संप चौथ्या दिवशीही सुरूच; नागरिकांचे होतेय हाल

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचा बेमुदत संप चौथ्या दिवशीही सुरूच; नागरिकांचे होतेय हाल

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन आज सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे.

Apr 24, 2026
चिखलीत महसूल कर्मचारी संघटनेचे निवेदन; उद्याही आंदोलन सुरूच राहणार

चिखलीत महसूल कर्मचारी संघटनेचे निवेदन; उद्याही आंदोलन सुरूच राहणार

राज्यातील सरकारी कर्मचारी-शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर चिखली महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Apr 22, 2026