परभणी गोदावरी नदी

परभणीतील ढालेगाव, तारुगव्हाण बंधार्‍यातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग...!

Parbhani Godavari River: नदीपात्रात १५,००० क्यूसेकन्या पाणी सोडणारे ढालेगाव आणि तारुगव्हाण बंधारा उघडून गावांना सत्यर्कता इशारा देण्यात आला. बंधारा ९२% भरण्यानंतर राबवले जाऊ शकणारे यंत्रणा.

परभणीतील ढालेगाव, तारुगव्हाण बंधार्‍यातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग...!

Parbhani Godavari River

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; १५ हजार ३५३ क्यूसेकने पाणी सोडले

परभणी (Parbhani Godavari River) : पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि तारुगव्हाण उच्च पातळी बंधार्‍यातून गोदावरी नदी पात्रात १५ हजार ३५३ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

सोमवार १० ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास तारुगव्हाण उच्च पातळी बंधार्‍याचे एक गेट उघडण्यात आले. या गेटमधून नदीपात्रात ८ हजार ५६१ क्युसेकने पाणी येत आहे. तर दुपारी पावणे दोनच्या सुमारास ढालेगाव उच्च पातळी बंधार्‍याचे एक गेट उघडण्यात आले असून ६ हजार ७९२ क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाणी येत आहे. तारुगव्हाण बंधारा ९२ टक्के भरला असल्याने या बंधार्‍याचे एक गेट उघडण्यात आले आहे. (Parbhani Godavari River) बंधार्‍यात येणार्‍या पाण्याच्या आवकनुसार सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये वाढ, घट करण्यात येणार आहे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करु नये, कुठलीही जीवित व वित्त हानी होऊ नये या करीता प्रशासकीय स्तरावरुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी सोडले; आमदार मिलिंद नरोटे यांच्या निर्देशानंतर शेतकऱ्यांना दिलासा

कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी सोडले; आमदार मिलिंद नरोटे यांच्या निर्देशानंतर शेतकऱ्यांना दिलासा

चामोर्शी तालुक्यातील शेतकरी नागरिकांच्या मागणीनंतर गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निर्देशानुसार कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी सोडण्यात आले.

Aug 11, 2026
पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा; खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली

पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा; खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली

पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

Jul 31, 2026
अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे.

Jul 31, 2026
दिना प्रकल्प ओसंडून वाहू लागला; 68 सें.मी. ओव्हरफ्लो, 131.951 क्युमेक्स विसर्ग सुरू

दिना प्रकल्प ओसंडून वाहू लागला; 68 सें.मी. ओव्हरफ्लो, 131.951 क्युमेक्स विसर्ग सुरू

चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय (दिना प्रकल्प) गुरुवारी (दि. 30 जुलै) सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असून धरणातून 68 सेंटीमीटर उंचीने पाणी ओसंडून वाहत आहे.

Jul 30, 2026
विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाची 2 दरवाजे उघडली..

विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पाची 2 दरवाजे उघडली..

Vishroli Purna Project: विश्रोळी येथील पूर्णा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढ, प्रकल्पातून नदीपात्रात १५.५० घनमीटर प्रतिवसेकंद विसर्ग सोडण्यात येत आहे.

Jul 08, 2026