परभणी मच्छीमार आत्मदहन

परभणीत मच्छीमारांचा सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न...!

Parbhani fisherman's self-immolation: प्रशासकीय फसवणूक, कामगार कायद्याचे उल्लंघन आणि शासकीय अनास्था याला कंटाळलेल्या पिडित जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील मच्छीमार

परभणीत मच्छीमारांचा सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न...!

Parbhani fisherman's self-immolation

 

प्रशासकीय फसवणूक, अनास्थेविरुध्द संताप परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना....!

परभणी (Parbhani fisherman's self-immolation) : प्रशासकीय फसवणूक, कामगार कायद्याचे उल्लंघन आणि शासकीय अनास्था याला कंटाळलेल्या पिडित जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथील मच्छीमारांनी बुधवार १० जून रोजी दुपारी ३ सुमारास परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर इंधन ओतलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी हस्तक्षेप करत ताब्यात घेतले. संबंधितांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

मासेमारी व्यवसाय असलेल्या कुटूंबीयांना स्व. राजीव गांधी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था बामणी यांनी परवाने नाकारले. मत्स्य व्यवसाय विभागाने जाचक अटी लावत कामगार कायद्याचे उल्लंघन केले. यातच संबंधितांवर जानेवारी महिन्यात जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पिडित मच्छीमार प्रविण मारोती जाधव, गौतम दशरथ गवळी, स्वप्नील वाटोळे, योगेश गुलाब तारे,  आकाश सुर्यकांत खंदारे, उमेश जाधव, अमोल गुलाब बचाटे, मनिष लाटे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. त्यानंतर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय परभणी यांनी पंधरा दिवसात बैठक लावून तोडगा काढू, असे आश्वासन दिल्याने आत्मदहनाचे आंदोलन मागे घेण्यात आले.

मात्र केवळ वेळकाढू पणा केल्याने मुदत संपूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रशासकीय फसवणूक, कामगार कायद्याचे उल्लंघन आणि शासकीय अनास्थेला कंटाळून पिडित मच्छीमारांनी बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सपोनि. विश्वजीत कासले, पोउपनि. उपोड, पोलीस अंमलदार राणी चोपडे, शेख सलमान, महेश कच्छवे, दिलीप निकाळजे, मळशीराम मुजमूले, नितनवरे यांनी आत्मदहन करणार्‍या सहा जणांना ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना नवामोंढा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.