शेतकरी कर्जमाफी आंदोलन

परभणीत पीकविमा, कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांचा एल्गार..!

Farmers' Loan Waiver Andolan: परभणीत शेतकर्यांनी कर्जमाफी, पीकविमा योजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन केले. मागण्या मानवल्यास हिंडापण न घालावयास म्हणून तिव्र आंदोलन करण्याची संकल्पना.

परभणीत पीकविमा, कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांचा एल्गार..!

Farmers' Loan Waiver Andolan

 

मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन करणार  जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन...!

परभणी (Farmers' Loan Waiver Andolan) : शेतकर्‍यांच्या विविध न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार १६ जून  रोजी पीक विमा २०२५, पीक विमा ट्रिगर आणि सरसकट कर्जमाफी या तीन मुख्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता करण्यात आलेल्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्ेयेने सहभागी झाले होते. 

परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२५ मधील पात्र असलेल्या महसूल मंडळातील शेतकर्‍यांना तात्काळ देय असलेली पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी, खरीप हंगाम २०२५ पासून महाराष्ट्र सरकारने शेतकर्‍यांना वैयक्तिक नुकसान भरपाई मिळवून देणारे, पंतप्रधान पीक विमा योजनेतील बंद केलेले चार ट्रिगर, जोखमीच्या बाबी पुन्हा सुरू करावेत, तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेतील 'उंबरठा उत्पादन' निश्चित करणारा जोखीम स्तर ७० टक्केवरून वाढवून तो १०० टक्के करण्यात यावा, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' मधील जाचक अटी रद्द करून शेतकर्‍यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी हे (Farmers' Loan Waiver Andolan) आंदोलन करण्यात आले.

सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन जिल्हा प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या (Farmers' Loan Waiver Andolan) आंदोलनात  मंगेश देशमुख, प्रताप शिंदे, विश्वभंर गोरवे, लिंबाजी देवकते, हेमचंद्र शिंदे, लव शेळके,  किरण चक्रपाणी, राजेंद्र जवळेकर आदींची उपस्थिती होती. शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या संदर्भात लवकर निर्णय  न घेतल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी शेतकर्‍यांनी दिला आहे.