परभणी व्यक्ती मृत्यू

परभणीत भरधाव कारच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू...!

Parbhani Person Death: परभणीत तालुक्यातील ताडकळस येथे रात्री नऊच्या सुमारे वाजत भरधावातील कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाली. त्याचा मृत्यु होण्याचा खुलासा झाला

परभणीत भरधाव कारच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू...!

Parbhani Person Death

 

ताडकळस- सिंगणापूर रस्त्यावर अपघात वाहन चालकावर गुन्हा दाखल....!

परभणी (Parbhani Person Death) : पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे भरधाव वेगातील कारच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार ११ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास सिंगणापूर रस्त्यावर घडली. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, ताडकळस येथील बांधकाम गुत्तेदार असलेले राम सिताराम बनसोडे वय ३९ वर्ष हे नेहमीप्रमाणे ताडकळस सिंगणापूरर स्त्यावरील गॅस एजन्सीजवळ चालण्याचा व्यायाम करुन पायी घरी जात होते. यावेळी मागुन आलेल्या भरधाव वेगातील एम.एच. २२ बी.झेड. ७५९१ या कारने त्यांना जोराची धडक दिली. अपघातात राम बनसोडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ताडकळस येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले.

पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. सदर प्रकरणी दशरथ बनसोडे यांच्या फिर्यादीवरुन ताडकळस पोलिसात कार चालका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवार १२ जुलै रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई - वडिल, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. सपोनि. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. तावडे तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

Risod-Lonar Road Car accident: रिसोड–लोणार मार्गावर दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव टिप्परने कारला धडक दिल्याची घटना मांगवाडी फाट्याजवळ

Sep 24, 2026
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ कार-कंटेनर अपघातात कर्ण पवार यांचा मृत्यू; अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे गंभीर जखमी.

Sep 22, 2026
प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात; ३ वाहनांना धडक

प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात; ३ वाहनांना धडक

ईस्टर्न फ्री वेवर प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; टॅक्सी आणि दोन कारला धडक. आमदार दरेकर सुरक्षित, पोलिसांचा तपास सुरू.

Sep 21, 2026
मुंबईत आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्ल्यात अपघात

मुंबईत आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्ल्यात अपघात

विलेपार्ल्यात आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक. सुनील धुलविया जखमी असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Sep 18, 2026
यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

घाटंजीतील चिखलवर्धा येथे कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय अंशचा उपचारादरम्यान मृत्यू. ऑक्सिजन व रुग्णवाहिका उपलब्धतेबाबत नातेवाइकांचे गंभीर आरोप.

Sep 18, 2026