नायब तहसीलदारावर जीवघेणा हल्ला; सिनेस्टाईल चार किलोमीटर फरफट

अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करणाऱ्या कुही तहसीलचे नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नायब तहसीलदारावर जीवघेणा हल्ला; सिनेस्टाईल चार किलोमीटर फरफट

Officer Attack​​​​​​​

वेलतूर (Officer Attack) : अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करणाऱ्या कुही तहसीलचे नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच जेसीबीवरून फेकण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ही घटना वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरी नाईक येथे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नायब तहसीलदार निकाळजे व त्यांच्या महसूल पथकाला या परिसरात जेसीबीच्या साहाय्याने दोन ट्रॅक्टरमध्ये अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालकाने निकाळजे यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

दरम्यान, एमएच 40 सिकु 23 88 क्रमांकाच्या जेसीबीला पकडण्याचा प्रयत्न करत असताना चालकाने जेसीबी वेगाने पळवली. यावेळी नायब तहसीलदार थेट जेसीबीवर चढले. मात्र चालकाने गाडी न थांबवता रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झाडांकडे वारंवार वळवत त्यांना खाली फेकण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान जेसीबीला लटकलेल्या नायब तहसीलदारांना तब्बल तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेण्यात आले.

या संपूर्ण घटनेचा नायब तहसीलदारांनी थेट लाईव्ह व्हिडिओ केला असल्याने माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलीस पथकाने वेळीच हस्तक्षेप करत जेसीबी थांबवली आणि मोठा अनर्थ टळला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 68, 132, 221, 121 (1), 109 तसेच सहकलम 48 (7), 48 (8) यांसह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेलतूर पोलिसांनी आरोपी जेसीबी चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026