नीट पेपरफुटी प्रकरण

नीट पेपरफुटी प्रकरणी परभणीत नागरीकांचे लाक्षणिक उपोषण

NEET Paper Leak Case: नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करावी

नीट पेपरफुटी प्रकरणी परभणीत नागरीकांचे लाक्षणिक उपोषण

NEET Paper Leak Case

 

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

परभणी (NEET Paper Leak Case) : नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांची स्वतंत्र चौकशी करावी तसेच जंतरमंतर येथे आंदोलन करणार्‍या शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक, विद्यार्थी व नागरिकांवरील दडपशाही थांबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी  सोमवार २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परभणीतील नागरीकांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन केले.

या (NEET Paper Leak Case) आंदोलनादरम्यान राष्ट्रपतींना उद्देशून जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नीट-यूजी - २०२६ परीक्षा रद्द होण्यास कारणीभूत ठरलेल्या पेपरफुटी व परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहारांचा निषेध करण्यात आला. वारंवार होणार्‍या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, न्यायालयीन देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी, पेपरफुटीमुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत, शांततामय आंदोलकांवरील कारवाई थांबविणे, आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवणे, पारदर्शक व पेपरफुटीमुक्त परीक्षा व्यवस्था उभारणे आणि बेरोजगार तरुणांचा सन्मान राखण्याची मागणी करण्यात आली.

उपोषणात अ‍ॅड. माधुरी क्षीरसागर, प्रा. डॉ. चंद्रकांत गांगुर्डे, रत्नमाला दिगंबर सिंगणकर, संजीवनी भराडे, धाराजी भुसारे, सुभाष पांचाळ, दिगंबर जाधव, ठोंबरे एस.डी. उध्दव देशमख, अतिख इनामदार, अनिल सुर्यवंशी, नितीन वैद्य, शेख अनिस, सिध्दार्थ निसर्गन, पवन वाघमोडे, अंजली थोरात अंकिता दिपके, किरण साळवे, पवन करवर, रमेश घनघाव, सुभाषराव राऊत, एम.एम. बरे, एन. आय. काळे, ए.के. पुंड, मन्मथ नावकरीकर, संजय मुळे, नागसेन भेरजे, प्रितम खंदारे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनाला माजी खा. फौजिया खान,  आ. डॉ.राहुल पाटील, रवि सोनकांबळे,  विविध कोचिंग क्लासेस संघटना, विद्यार्थी, एसएफआय स्टुडंट फेडरेशन तसेच विविध समविचारी सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शविला. 'वी सपोर्ट सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके' अशा घोषणांसह केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

संबंधित सामग्री

CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार; अभिजीत दिपकेंचा ‘जेल भरो’चा इशारा

CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार; अभिजीत दिपकेंचा ‘जेल भरो’चा इशारा

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून देशात राजकीय वाद सुरू असतानाच आता कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलनाची घोषणा केली आहे.

Sep 27, 2026
सोनम वांगचुकांच्या लडाख पदयात्रेत CJPचे प्रमुख नेते गैरहजर

सोनम वांगचुकांच्या लडाख पदयात्रेत CJPचे प्रमुख नेते गैरहजर

लडाखच्या मागण्यांसाठी सोनम वांगचुकांची लेहमध्ये पदयात्रा; CJP नेत्यांची अनुपस्थिती आणि २० जणांवरील गुन्हे मागे घेण्याचा प्रशासनाचा निर्णय चर्चेत.

Sep 24, 2026
'मोदी सरकारवरील माझा विश्वास उडाला!', सोनम वांगचुकांचा मोठा दावा

'मोदी सरकारवरील माझा विश्वास उडाला!', सोनम वांगचुकांचा मोठा दावा

Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला 26 दिवसांचा उपवास संपवल्यानंतर एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. त्यांचा आरोप आहे की, सरकारने आपली आश्वासने पूर्ण केली नाहीत..

Aug 06, 2026
'हा लोकशाहीचा विजय'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया

'हा लोकशाहीचा विजय'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया

Dharmendra Pradhan Resignation: NEET-UG पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया..

Jul 25, 2026
सोनम वांगचुक यांचा संताप; '२६ दिवस उपोषण केल्यानंतरही प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागणार?'

सोनम वांगचुक यांचा संताप; '२६ दिवस उपोषण केल्यानंतरही प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागणार?'

नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांनंतर उपोषण समाप्त केले.

Jul 25, 2026