नया पेट्रोल पंप वितरण नियम

आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल

Petrol-Diesel Crisis: जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील ने पेट्रोल और डीजल वितरण के लिए नए नियम लागू किए हैं, जिसमें वाहनों के लिए ईंधन सीमा तय की गई है।

आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल

Petrol-Diesel Crisis

जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी काढले आदेश

हिंगोली (Petrol-Diesel Crisis) : मध्यपुर्व आशियातील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमिवर अनेक पेट्रोलपंपावर वाहन धारकांच्या पेट्रोल, डिझेलसाठी रांगा लागत आहेत. त्यातून वाद घडत असल्याने आता जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी पेट्रोलपंपावरील वितरण व्यवस्था सुरळीत राहण्याकरीता गुरूवारी आदेश काढले आहेत. मध्यपुर्व आशियातील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमिवर पेट्रोल व डिझेल तुटवड्याच्या (Petrol-Diesel Crisis) अफवा पसरत असल्यामुळे अनेक वाहन धारक पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेल टाकण्याकरीता गर्दी करीत आहेत.

तीन चाकी व चार चाकीसाठी दोन हजार रुपयांचे इंधन मिळणार

परिणामी ही गर्दी पाहुन इतर ही वाहन चालक पेट्रोलपंपावर जात आहेत. परिणामी अनेक पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लागत आहेत. काही ठिकाणी मागणी पेक्षा अधिक डिझेल करीता वाहनांच्या रांगा लागल्याने डिझेलचा साठा पेट्रोलपंपावर ही संपला. परिणामी वाहन चालक व पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यात वादावादीच्या घटना घडत आहेत. अशा अनुसूचित घटना टाळण्याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी २६ मार्चला (Petrol-Diesel Crisis) पेट्रोल व डिझेल संदर्भात आदेश काढले.

कॅन, बाटली व ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई

ज्यामध्ये दुचाकी वाहनासाठी जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत इंधन भरले जाणार, तीन चाकी व चार चाकी वाहनाकरीता जास्तीत जास्त दोन हजार रुपयांपर्यंत इंधन दिले जाणार, कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम आदीमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी इंधन तुटवड्याच्या होणार्‍या अफवामुळे पेट्रोलपंपावर अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसार इंधन घ्यावे, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवासाठी संबंधित वाहनांना प्राधान्याने (Petrol-Diesel Crisis) इंधन पुरवठा करण्यात यावा.

प्रत्येक पेट्रोलपंपावर मागणी केलेला साठा व प्राप्त इंधन साठ्याची माहिती फलकावर प्रदर्शीत करणे केले बंधनकारक

प्रत्येक पेट्रोलपंप चालकाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला (Petrol-Diesel Crisis) पेट्रोल डिझेलचा शिल्लक साठा व त्या दिवशी प्राप्त झालेला साठा आणि मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शीत करणे बंधनकारक राहणार आहे. सर्व पेट्रोलपंप धारकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे आदेशाचे उल्लंघन करणार्‍यावर जिवनाश्यक वस्तु अधिनियम १९५५ कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजीचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजीचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

Collector Rahul Gupta: हिंगोली जिल्ह्यात इंधन (पेट्रोल, डिझेल) आणि घरगुती गॅस (एलपीजी)चा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाने अफवांबद्दल नागरिकांना चेतावणी दिली.

May 26, 2026
 शासकीय कामे सुरळीत चालण्यासाठी डिझेल पुरवठ्याला परवानगी

 शासकीय कामे सुरळीत चालण्यासाठी डिझेल पुरवठ्याला परवानगी

Hingoli Diesel Supply: जिल्हा पुरवठा विभागाने शासकीय कामांसाठी डिझेल पुरवठ्याची परवानगी देऊन ग्रामीण क्षेत्रातील पाणीपुरवठा, आरोग्यसेवा इत्यादींना गती देण्याचा निर्णय

May 24, 2026
व्यवसायीक गॅस सिलेंडरची मागणी अधिक; पुरवठा कमी

व्यवसायीक गॅस सिलेंडरची मागणी अधिक; पुरवठा कमी

Gas Cylinders Supply: हिंगोलीमध्ये व्यवसायीक गॅस सिलेंडरची मागणी वाढत असताना पुरवठा कमी झाल्याने अनेक हॉटेल व ढाबे अडचणीत. जिल्हा पुरवठा अधिकारीने आढावा घेतला.

Apr 01, 2026
पेट्रोल-डिझेल बंद होणार? अफवेमुळे कळमनुरी शहरातील पंपांवर तुफान गर्दी

पेट्रोल-डिझेल बंद होणार? अफवेमुळे कळमनुरी शहरातील पंपांवर तुफान गर्दी

Petrol-Diesel Crisis: कळमनुरीत पेट्रोल व डिझेल बंद होण्याच्या अफवामुळे नागरिकांमध्ये घबराट उद्भवली, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा दिसून आल्या.

Mar 26, 2026