हिंगोली चोरी प्रकरण

हिंगोलीत बँकेसमोरील कारची काच फोडून, पळविली ५ लाखाची रोकड

Hingoli theft case: हिंगोली शहरात एसबीआय बँकेसमोर रस्त्यावर नांदेडच्या व्यापार्याने कारमध्ये ५ लाख रुपये ठेवले होते.

हिंगोलीत बँकेसमोरील कारची काच फोडून, पळविली ५ लाखाची रोकड

Hingoli theft case

हिंगोली (Hingoli theft case) : शहरातील एसबीआय बँकेसमोरील  रस्त्यावर नांदेडच्या व्यापार्‍यांनी कारमध्ये ५ लाख रुपये  ठेवले  होते. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कारच्या  दरवाजाची काच फोडून ५ लाख रुपये लांबविले. नांदेड  विजय नगरातील उमाशंकर  साहेबराव कदम या व्यापार्‍याने १९ मे रोजी दुपारच्या  सुमारास १०० नोटांचे १० बंडल असे एकूण ५   लाख रुपये  कार क्रमांक  एम.एच.३८ ए.के.  ९०९९ यामध्ये चालकाच्या सिटच्या  पाठीमागे कपड्याच्या  पिशवीमध्ये ठेवले  होते.

कोणीतरी (Hingoli theft case) अज्ञात चोरट्याने कारच्या डाव्या बाजूच्या  दरवाजाची काच फोडून ५ लाख रुपये चोरून नेले. तसेच कारच्या  दरवाजाची  काच फोडून ३ हजार रुपयाचे नुकसान केल्याने हिंगोली शहर  पोलिसात सायंकाळी ४.३० वाजता गुन्हा  दाखल झाला. घटनास्थळी  पोलिस  निरीक्षक  संदिप मोदे, सपोनि एस.एस. परगेवार,  अशोक धामणे, संतोष करे, गणेश वाबळे, शेख  मुजीब, गणेश लेकुळे, राहुल जोगे यांच्या पथकाने  भेट  दिली. बँकेच्या समोरील  व इतर ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज पाहणी केली जात आहे.

संबंधित सामग्री

परभणीत पाथरीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरीचा प्रयत्न; चोरटा सीसीटीव्हीत कैद

परभणीत पाथरीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरीचा प्रयत्न; चोरटा सीसीटीव्हीत कैद

Parbhani bank robbery: परभणी पाथरीत बँकेत चोरीचा प्रयत्न झाला. बुधवारी रात्री सीसीटीव्हीवर कैद झालेल्या संशयिताने व्यवस्थापकांच्या केबिनमार्गे कॅशियरच्या टेबलापर्यंत पोहोचला.

Jun 04, 2026