कुरखेडा (Nagpur Karar Holi Andolan) : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरखेडा परिसरात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तसेच नागपूर करारातील अटींची पूर्तता झाली नसल्याचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘जय विदर्भ’, ‘आमचे राज्य—विदर्भ राज्य’ अशा घोषणा देत नागपूर कराराच्या प्रतीचे प्रतीकात्मक दहन केले. आंदोलनात गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, घिसू पाटील खुणे, मुताजी दुर्गे ,रामचंद्र कोडाप, नितेश ko, सेवाराम ठेला, शोभिराम सोनजाल, संतोष सहाला,यादव राऊत सह कुरखेडा व कोरची तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झाले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारातील अटींची पूर्तता झालेली नसल्याचा दावा करत २८ सप्टेंबर २०२६ रोजी विदर्भातील ११ जिल्ह्यांतील १२० तालुक्यांत ‘नागपूर करार होळी’ आंदोलनाचे आवाहन केले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला अधिक तीव्र करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
नागपूर करार होळी आंदोलन
कुरखेड्यात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन; स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा एल्गार
Nagpur Karar Holi Andolan: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरखेडा परिसरात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तसेच नागपूर करार
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Nagpur Karar Holi Andolan
टैग्स:
Nagpur Karar Holi Andolan