Murder Case

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला दोन दिवसांची पोलीस कोठडी; वडील व भावाला न्यायालयीन कोठडी

जिंतूर तालुक्यातील धानोरा देवगाव येथे दारूच्या पैशांच्या वादातून पत्नीची लोखंडी रॉडने हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी पतीला जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला दोन दिवसांची पोलीस कोठडी; वडील व भावाला न्यायालयीन कोठडी

Murder Case

परभणी (Murder Case) : जिंतूर तालुक्यातील धानोरा देवगाव येथे दारूच्या पैशांच्या वादातून पत्नीची लोखंडी रॉडने हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी पतीला जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपीचे वडील आणि भावाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा देवगाव येथे गुरुवार (२५ जून) रोजी दुपारच्या सुमारास गजानन ज्ञानेश्वर कुटे याने दारूच्या पैशांच्या कारणावरून पत्नीची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.

या घटनेनंतर कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांचे नातू नाना बांगर तसेच मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली होती.

यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी गजानन ज्ञानेश्वर कुटे याच्यासह त्याचे वडील ज्ञानेश्वर कुटे आणि भाऊ देवानंद कुटे यांना ताब्यात घेऊन अटक केली.

शुक्रवार (२६ जून) रोजी आरोपींना जिंतूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मुख्य आरोपी गजानन ज्ञानेश्वर कुटे याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर त्याचे वडील ज्ञानेश्वर कुटे आणि भाऊ देवानंद कुटे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, या प्रकरणातील चौथा आरोपी सुदाम कुटे अद्याप फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून तिघांना अटक झाली आहे. CCTV, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू आहे.

Oct 03, 2026