Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > मुंबई

Mount Mary Fair

माऊंट मेरी जत्रेत नशेत महिलेचा धिंगाणा; महिला पोलीस शिपाईच्या दंडाला चावा

माऊंट मेरी जत्रेदरम्यान वांद्र्यात पोलिसांशी हुज्जत घालताना महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या दंडाला चावा घेतला. निकी जसिंग्टोला अटक करण्यात आली.


माऊंट मेरी जत्रेत नशेत महिलेचा धिंगाणा महिला पोलीस शिपाईच्या दंडाला चावा

Mount Mary Fair |

मुंबई : माऊंट मेरी जत्रेदरम्यान वांद्रे परिसरात पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला आहे. परिसरात गोंधळ घालणाऱ्या नशेत असणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना तिने महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या दंडाला चावा घेतल्याची घटना घडली. या प्रकारात वांद्रे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई यशोदा चौगुले जखमी झाल्या आहेत.

या प्रकरणी निकी जसिंग्टो या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केल्याप्रकरणी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माऊंट मेरी जत्रेदरम्यान एका महिलेचा परिसरात गोंधळ सुरू असल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संबंधित महिलेशी संवाद साधत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.

गोंधळ न घालता परिसरातून निघून जाण्याची सूचना पोलिसांनी महिलेला केली. मात्र, तिने पोलिसांचे म्हणणे मान्य केले नाही. परिस्थिती कायम राहिल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

याचदरम्यान निकी जसिंग्टो हिने महिला पोलीस शिपाई यशोदा चौगुले यांच्या दंडाला चावा घेतल्याचे समोर आले. या हल्ल्यात चौगुले जखमी झाल्या. त्यानंतर पोलिसांनी निकी जसिंग्टोला ताब्यात घेत अटक केली.

माऊंट मेरी जत्रेला मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांशी गैरवर्तन करत महिला पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केल्याच्या या घटनेची वांद्रे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

निकी जसिंग्टो हिच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून तिला जखमी करणे, या आरोपांखाली कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत.

Related to this topic: