अल्पवयीन मुलीची आत्महत्या; छेडछाडी करणाऱ्यावर  गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकाच्या मोठा जमाव पोलीस ठाण्यात

कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी येथे अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीची आत्महत्या; छेडछाडी करणाऱ्यावर  गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकाच्या मोठा जमाव पोलीस ठाण्यात

Molestation Case

कळमनुरी (Molestation Case) : कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी येथे अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी दोन तरुणांवर गंभीर आरोप करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 18 एप्रिल रोजी नातेवाईकाचे मोठा जमाव पोलीस ठाण्यावर जाऊन छेडछाड करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करा अशी  मागणी केल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केले.

पोलीस ठाणे कळमनुरी येथे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार मयत मुलीची आईने तक्रार दिली आहे की, दिनांक 16 एप्रिल व 17 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारास आरोपी रितेश नंदु घोटेकर (वय 25) व ओमकार शिवाजी शेळके (वय 22, दोघे यांनी त्यांच्या 15 वर्षीय मुलीची घरात घुसून छेडछाड केली.

सदर मुलीची छेडछाड केल्यामुळे घाबरलेल्या व मानसिक तणावात आलेल्या अल्पवयीन मुलीने 17 एप्रिल रोजी सायंकाळी घरातील छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. मयत मुलीवर शवविच्छेदन केल्यानंतर मयत मुलीचे नातेवाईक पोलीस ठाण्यात येऊन जोपर्यंत छेडछाड करणाऱ्या आरोपी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका घेतली यानंतर पोलिसांनी दोन जणा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह तसेच पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सद्यस्थितीत आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक माकोडे व इतर अधिकारी घटनास्थळी भेट देऊन तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026