आमदार श्वेताताई महाले पाटील

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

MLA Shwetatai Mahale Patil: गावातील महिला व नागरिकांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची समस्या सोडविण्याची मागणी केली होती. रहिवासी भागातील

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

MLA Shwetatai Mahale Patil


विहिरीत पाणी, पण वीजअभावी सिंचनाचा प्रश्न; अखेर दिवठाण्यात शेतकऱ्यांना दिलासा
आठ दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध; आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याचे शेतकरी व ग्रामस्थांकडून स्वागत

चिखली (MLA Shwetatai Mahale Patil) : पावसाने उघडीप दिल्याने विहीर व बोअरवेलमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करून शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एकाच ट्रान्सफॉर्मरवर रहिवासी परिसरासह शेतीपंपांचा विद्युत भार असल्याने ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण येऊन वारंवार बिघाड होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही विद्युत पुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नव्हते. दिवठाणा येथील शेतकऱ्यांची ही अडचण आता दूर झाली आहे.

गावातील महिला व नागरिकांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची समस्या सोडविण्याची मागणी केली होती. रहिवासी भागातील वीजपुरवठा आणि शेतीसाठी लागणारा विद्युत पुरवठा एकाच ट्रान्सफॉर्मरवर अवलंबून असल्याने दरवर्षी ही समस्या निर्माण होत होती. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेत आमदार श्वेताताई महाले पाटील (MLA Shwetatai Mahale Patil) यांनी संबंधित विद्युत यंत्रणेशी संपर्क साधून तातडीने समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विकास गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अवघ्या आठ दिवसांत मार्गी लागला. संबंधित ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यात आला, तर शेतातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरचीही दुरुस्ती करण्यात आली.

नवीन ट्रान्सफॉर्मर मिळाल्याने रहिवासी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, शेतातील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने उघडीप दिलेल्या काळात पिकांना पाणी देणे शक्य झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासूनची समस्या अवघ्या आठ दिवसांत मार्गी लावल्याबद्दल दिवठाणा येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आमदार श्वेताताई महाले पाटील (MLA Shwetatai Mahale Patil) यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्यांच्या तत्पर पाठपुराव्यामुळे गावातील नागरिक आणि शेतकरी या दोन्ही घटकांना दिलासा मिळाल्याने दिवठाण्यात समाधान व आनंदाचे वातावरण आहे.