आमदार रोहित पवार

हे सरकार, गेंड्याच्या कातडीचे सरकार!

MLA Rohit Pawar: लातूर जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यात पावसाअभावी पिके करपून गेली आहेत. जेथे काही हिरवेगार पिके दिसतात, तेथे सोयाबीनला शेंगा नाहीत. एकंदर शेतकऱ्याच्या हातातून हा हंगाम गेला असून..

हे सरकार, गेंड्याच्या कातडीचे सरकार!

MLA Rohit Pawar

 

आमदार रोहित पवार यांचा घणाघात; लातूर जिल्ह्यात केली पीक पाहणी

लातूर/अहमदपूर (MLA Rohit Pawar) : लातूर जिल्हा तसेच संपूर्ण मराठवाड्यात पावसाअभावी पिके करपून गेली आहेत. जेथे काही हिरवेगार पिके दिसतात, तेथे सोयाबीनला शेंगा नाहीत. एकंदर शेतकऱ्याच्या हातातून हा हंगाम गेला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र सरकार वेळ काढूपणाची भूमिका घेत आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी केली. 

रविवारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरात आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी प्रत्यक्ष पीक पाहणी केली. किनगाव येथे सायंकाळी ५ च्या सुमारास शेतकरी विनोद अशोक शेळके त्यांच्या शेतीत पाणी केली. शेळके यांना ३ एकर शेती असून शेतातील सोयाबीन, तूर पीक करपून गेले असल्याचे पाहणीत दिसून आले. यावेळी किनगाव येथील शेतकरी बाबासाहेब मुंढे यांना ढसा-ढसा रडत शेतकऱ्यांची व्यथा मांडली. आ. रोहित पवार यांनी पाटोदा व कोपदेव हिप्परगा येथे के.टी. वेअर बंधारा व पाझर तलावाची पाहणी करून काजळ हिप्परगा येथेही पीक पाहणी केली.

प्रत्यक्ष पीक पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा आ. पवार यांनी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. अनेकांच्या घरांमध्ये सध्याच्या खाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत हंगाम हातचा गेला असताना सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नाही. सरकारमधील मंत्री काजू-बदाम खाण्यात व्यस्त आहेत, अशी टीका आमदार पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा व येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारने थेट मदत करावी.  लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चारा छावण्या उभा कराव्यात. तसेच कर्जमाफीची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सोमेश्वर कदम, संजय शेटे, निलेश देशमुख, संतोष बोराडे, भरत सूर्यवंशी, केदार काडवदे, संग्राम पवार, चंद्रकांत मद्दे, विलास पाटील, साजिद भाई, आर. आर. बोडके व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लातूर येथे मोर्चा काढण्याचा इशारा..
दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत द्यावी. मजुरांना २५ हजार रुपये मदत करावी. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली. या मागण्यांसाठी येत्या २४ तारखेला बीड येथे मोर्चा काढणार असून त्यानंतर लातूर येथेही मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.

टैग्स: MLA Rohit Pawar

संबंधित सामग्री

शेतकऱ्याला 50 हजार द्या, नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही

शेतकऱ्याला 50 हजार द्या, नाहीतर रस्त्यावर फिरू देणार नाही

MLA Rohit Pawar: जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि एका शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी २१ सप्टेंबरला हिंगोली जिल्ह्यातील शेतांची पाहणी केली...

Sep 21, 2026