रिसोड (Marriage Registration Certificate) : रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची प्रक्रिया तात्काळ ऑनलाइन करून बारकोडयुक्त डिजिटल प्रमाणपत्रे वितरित करण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तथा विवाह नोंदणी निबंधक डॉ. प्रशांत पवार यांना भाजप शिष्टमंडळाने निवेदन दिले.
शासनाच्या अधिसूचनेनुसार व नियमांनुसार ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विवाह नोंदणी निबंधक म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. मात्र, सध्या या कार्यालयाकडून नागरिकांना केवळ ऑफलाइन स्वरूपातील प्रमाणपत्रे दिली जात आहेत. विवाहाची नोंद झाल्यानंतर आधार कार्डमध्ये नाव दुरुस्ती करणे किंवा पतीचे नाव समाविष्ट करणे यासारख्या कामांसाठी सेवा पोर्टलवर बारकोड असलेले ऑनलाइन विवाह नोंदणी प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक असते. ऑफलाइन प्रमाणपत्र उपलब्ध असल्याने ते शासकीय प्रणालीत ग्राह्य धरले जात नाही, ज्यामुळे नागरिकांची कामे रखडत असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रशासनाने नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन ग्रामीण रुग्णालयात तात्काळ ऑनलाइन प्रणाली सुरू करावी आणि बारकोडयुक्त प्रमाणपत्रे देण्याचे पाऊल उचलावे, असा आग्रह निवेदनाद्वारे धरण्यात आला. हे निवेदन देताना भाजपचे मयूर नकवाल, विकास पाटील झुंगरे, मंगल खिल्लारे, दीपक गिराम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
रिसोड ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्याची मागणी; भाजपचे निबंधकांना निवेदन
Marriage Registration Certificate: रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयातून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची प्रक्रिया तात्काळ ऑनलाइन करून बारकोडयुक्त डिजिटल प्रमाणपत्रे वितरित
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Marriage Registration Certificate