पूज्य कालिदास महाराज

परभणीत गोदावरी तीरावर पूज्य कालिदास महाराजांना अखेरचा निरोप; चारही वेदांच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार

Kalidas Maharaj: पाथरी तालुक्यातील गुंज (खुरड) येथून नाशिकचे दत्त सदायाचे संत कालिदास महाराजांना शनिवार रोजी १८ जुलैला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा अंत्ययात्रा चारी वेदांचा मंत्र घोष

परभणीत गोदावरी तीरावर पूज्य कालिदास महाराजांना अखेरचा निरोप; चारही वेदांच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार

Kalidas Maharaj

परभणी (Kalidas Maharaj) : पाथरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र गुंज (खुर्द) येथील शिवाश्रमाचे पूज्य कालिदास महाराज यांच्या पार्थिवावर शनिवारी गोदावरी तीरावर चारही वेदांच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू श्रीपाद बोरीकर यांनी महाराजांना अग्नी दिला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. गुंज (खुर्द) येथील शिवाश्रमाचे पूज्य कालिदास महाराज यांचे शुक्रवार १७ जुलै संभाजीनगर येथे अपघाती निधन झाले होते. दत्त संप्रदायातील अभ्यासू व श्रद्धास्थान असलेले संत म्हणून त्यांची ओळख होती.

शनिवार १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून महाराजांची (Kalidas Maharaj) अंत्ययात्रा काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात ही अंत्ययात्रा गुंज गावातून निशाण घाटापर्यंत नेण्यात आली. गोदावरी तीरावर नाशिक येथील पूज्य दत्तदास महाराज यांच्या उपस्थितीत वेदशास्त्रसंपन्न दिनकर गुरुजी जोशी, कृष्णा पळसकर, गोविलकर गुरुजी, सुनील वसेकर गुरुजी, राघव कुलकर्णी, तुळजदास भोपी ओंढेकर यांच्यासह मराठवाड्यातील ब्रह्मवृंदाने चारही वेदांच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार विधी पार पाडले.अंत्यसंस्कारावेळी हजारो भाविकांनी अश्रुपूर्ण वातावरणात पूज्य कालिदास महाराजांना अखेरचा निरोप दिला.