परभणी हिंसक हल्ला

परभणीत लोखंडी रॉडने हल्ला; दोघे गंभीर जखमी

Parbhani Violent Attack: जिंतूर, परभणी - जिंतूर शहरातील बेलदार नगरात लोखंडी रॉडच्यावर एक कट्टर वाद झाला. त्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले, तर वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल

परभणीत लोखंडी रॉडने हल्ला; दोघे गंभीर जखमी

Parbhani Violent Attack

 

जिंतूर शहरातील घटना; किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी

परभणी (Parbhani Violent Attack) : जिंतूर  येथील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाला हिंसक वळण लागले. यानंतर झालेल्या लोखंडी रॉडच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जिंतूर शहरातील बेलदार नगर परिसरात मंगळवार ३० जून रोजी घडली. 

नाजेर खान ताहेर पठाण व शेख कलीम शेख खालेद असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. या (Parbhani Violent Attack) घटनेविषयी अधिक माहिती अशी की, नाजेर खान पठाण हे जड वाहनातून मुरूंब घेऊन परिसरात आले होते. त्यावेळी शेख कलीम यांच्या सोबत किरकोळ कारणा वरून वाद झाला. सुरूवातीला शाब्दीक चकमक झाली. थोड्याच वेळात वाद विकोपाला गेला. दोन्ही बाजूंनी लोखंडी रॉड व लाठ्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला.

त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या (Parbhani Violent Attack) हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख अजीज व कर्मचार्‍यांनी प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी संबंधितांना शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत जिंतूर पोलिसात नोंद झाली नव्हती.