उपविभागीय अभियंत्यांनी निवेदन स्वीकारले; रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती
घोट (Chakka Jam Andolan) : घोट–रेगडी मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांनी सोमवार, दि. १३ जुलै रोजी रेगडी येथील देवदा मार्गावर भव्य चक्का जाम आंदोलन केले. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नूतनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पार पडले.

अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरवस्था कायम असून वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या (Chakka Jam Andolan) आंदोलनाचे नेतृत्व भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी केले. यावेळी "आमचा रस्ता, आमचा हक्क"अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.आंदोलनात प्रशांत शहा (शिवसेना बंगाली आघाडी जिल्हा सचिव तथा विदर्भ आंदोलन समिती दक्षिण विभाग अध्यक्ष), अशोक पोरेडीवार,रेगडीच्या सरपंच सुरेखा गेडाम,माडेआमगावचे सरपंच अमोल पुंगाटी,तारक हलदार,सोमनाथ वैध, बाजीराव गावडे,तोंदेश तलांडे,उमेश मल्लिक, प्रकाश शहा,देवराव खंडरे, प्रशांत मोहुर्ले,शुभम कुंडू यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाकडून लवकरच काम सुरू होण्याचे आश्वासन
आंदोलनस्थळी (Chakka Jam Andolan) चामोर्शी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता धिरज बड्डे,शाखा अभिर्यता रूपाली काळे यांनी भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. घोट–रेगडी मार्गाच्या दुरुस्तीचे टेंडर प्रक्रियेचे काम सुरू असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.