मानोरा तालुका दुष्काळ

मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी १६ सप्टेंबरला जन आक्रोश आंदोलन

Manora Taluka Drought: मानोरा तालुक्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे संकट ओढावले आहे. पिके करपून गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

मानोरा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी १६ सप्टेंबरला जन आक्रोश आंदोलन

Manora Taluka Drought

 

महाविकास आघाडीची नियोजन बैठक उत्साहात

मानोरा (Manora Taluka Drought) : मानोरा तालुक्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे संकट ओढावले आहे. पिके करपून गेली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर मानोरा तालुका तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा यासह विविध मागणीसाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, पंचायत समिती, मानोरा ते तहसिल कचेरीवर  भव्य मोर्चा व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दि. ९ सप्टेंबर रोजी माजी आ. अनंतकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम नियोजन बैठक उत्साहात पार पडली. 

मोर्चाद्वारे मानोरा तालुका तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा,  सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सरसकट आर्थिक मदत द्या. पीक विमा व कर्ज वसुलीला तात्काळ स्थगिती द्या, 
नवीन पीक कर्जाचे सुलभ व तात्काळ वितरण करा, जनावरांसाठी चारा छावण्या व पाण्याची त्वरित सोय करा. या (Manora Taluka Drought) मागण्यासह सद्यस्थितीत तालुक्यातील नदी-नाले, विहिरी कोरड्या पडल्या असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यावेळी बैठकीला माजी आमदार अनंतकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, माझी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड, बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे, शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख रविंद्र पवार, काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस अमोल पाटील तरोडकर, काँग्रेसचे नेते इफ्तेखार पटेल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूसिंग नाईक, महंत रमेश महाराज, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष काशीराम राठोड, मनसेचे तालुकाध्यक्ष देवा बारसे, बाजार समितीचे संचालक सुनील जामदार, रवी चौधरी, शाम राठोड, कैलास भगत, सुशांत खडसे, पारधी भाऊ,  वसंत भगत, लक्ष्मीकांत वाघमारे, आवेश सरमतिया आदीसह शेतकरी उपस्थित होते. 

टैग्स: Manora Taluka Drought

संबंधित सामग्री

विधिमंडळ अवलोकन समितीकडे मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी

विधिमंडळ अवलोकन समितीकडे मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणी

Manora Taluka Drought: डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शिक्षण, सिंचन व आरोग्यासह मूलभूत सुविधापासून वंचित असलेल्या राज्यातील अती मागास आकांक्षीत तालुका म्हणून राज्यात गणना होणाऱ्या मानोरा

Sep 14, 2026
मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; उद्या तहसीलवर बैलासह पोळा मोर्चा धडकणार

मानोरा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; उद्या तहसीलवर बैलासह पोळा मोर्चा धडकणार

Manora Taluka Drought: गेल्या अनेक दिवसांपासून मानोरा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद यासह सर्वच पिके करपून गेली आहेत.

Sep 09, 2026