मानोरा पोलिस CEIR पोर्टल

मानोरा पोलिसांची सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी

Manora Police CEIR Portal: पोलीस स्टेशन मानोरा हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले १८ मोबाईल फोन सीईआय आर (सेंट्रल  रिक्वाइमेंट आयडेंटिटी रजिस्टर) पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात मानोरा पोलिसांना यश

मानोरा पोलिसांची सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी

Manora Police CEIR Portal

 

गहाळ झालेले १८ मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत
१ लाख ८० हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत;
अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या हस्ते वितरण

मानोरा (Manora Police CEIR Portal) : पोलीस स्टेशन मानोरा हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले १८ मोबाईल फोन सीईआय आर (सेंट्रल  रिक्वाइमेंट आयडेंटिटी रजिस्टर) पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात मानोरा पोलिसांना यश आले आहे. शोधून काढण्यात आलेले मोबाईल फोन दि. १८ सप्टेंबर रोजी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.

पोलीस स्टेशन मानोरा येथे पो.स्टे. हद्दीतील नागरिकांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रार केली होती. सदर तक्रारीची दखल घेत मानोरा पोलिसांनी सीइआयआर पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेतला. सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर हे मोबाईल शोधून काढण्यात आले. हरविलेले मोबाईल ट्रेस करून १८ मोबाईलचा शोध लावला व पो. स्टे. ला हस्तगत केले. नागरिकांना परत करण्यात आलेल्या १८ मोबाईल फोनची एकूण अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये इतकी आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मानोरा येथील पोलीस निरीक्षक नैना पोहेकर मॅडम, सपोनि जयदीप पवार, पोलीस अंमलदार वैभव गाढवे व पोलीस अंमलदार पंकज खाडे यांनी केली. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित तक्रारदारांनी मानोरा पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

मोबाईल गहाळ झाल्यास तात्काळ पोलिसात तक्रार करा. मोबाईल फोन गहाळ झाल्यास नागरिकांनी विलंब न करता संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, तसेच आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशन मानोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.