माहूर येथील ‘१०२’ रुग्णवाहिका चालकांच्या मानधनाचा प्रश्न सुटला

नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील ‘१०२’ रुग्णवाहिका वाहनचालकांच्या प्रलंबित मानधनाचा (पगार) प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

माहूर येथील ‘१०२’ रुग्णवाहिका चालकांच्या मानधनाचा प्रश्न सुटला

Mahur Ambulance Drivers

आमदार संतोष बांगर यांच्या मध्यस्थीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना

हिंगोली (Mahur Ambulance Drivers) : नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील ‘१०२’ रुग्णवाहिका वाहनचालकांच्या प्रलंबित मानधनाचा (पगार) प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या संदर्भातील तक्रार घेऊन वाहनचालकांनी १२ जून रोजी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांची भेट घेतली. चालकांच्या अडचणी जाणून घेताच आमदार बांगर यांनी मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी सूचना दिल्या. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माहूर येथील ‘१०२’ रुग्णवाहिका चालकांना इतर जिल्ह्यांतील चालकांच्या तुलनेत कमी मानधन मिळत होते. दिवस-रात्र रुग्णसेवा करूनही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने चालकांमध्ये नाराजी होती. इतर जिल्ह्यांप्रमाणेच समान मानधन मिळावे, या मागणीसाठी त्यांनी आमदार संतोष बांगर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

आमदार बांगर यांचा तात्काळ हस्तक्षेप

वाहनचालकांनी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेत आमदार संतोष बांगर यांनी विलंब न करता मुंबईतील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत माहूर येथील चालकांवर अन्याय का होत आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पगारातील तफावत दूर करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

चालकांकडून समाधान व्यक्त

आमदारांच्या हस्तक्षेपानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. लोकप्रतिनिधीने तातडीने दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन अडचणीच्या काळात पाठीशी उभे राहिल्याबद्दल माहूर येथील ‘१०२’ रुग्णवाहिका चालकांनी आमदार संतोष बांगर यांचे आभार व्यक्त केले.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026