शिवसेना ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा

सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा

ShivSena Tractor-Bullock Rally: शेतकर्यांचा कर्जमाफीच्या प्रश्नावर शिवसेनेने मंगळवारी तहसीलकांना धडका देण्याचा मोर्चा आयोजित. करजमाफी धोरणाचा तात्काळ अंमलबजावणी करणे मागण्यात आले.

सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेनेचा ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा

ShivSena Tractor-Bullock Rally

 

तहसील कार्यालयावर धडक; घोषणाबाजीने सेनगाव दणाणले

सेनगाव (ShivSena Tractor-Bullock Rally) : राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असून सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी (उबाटा) शिवसेनेच्या वतीने सेनगाव येथे मंगळवार ता. १६ जुन रोजी भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या सहभागामुळे हा मोर्चा तालुक्यात लक्षवेधी ठरला.

सेनगाव नगरपंचायत कार्यालया समोरून सकाळी दहा वाजता वाजतगाजत मोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडत मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधींनी (ShivSena Tractor-Bullock Rally) सरकारच्या कर्जमाफी धोरणावर जोरदार टीका केली.

मोर्चामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, दिलीपराव घुगे, जिल्हा समन्वयक दिनकरराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण देशमुख, गणेश शिंदे, तालुकाप्रमुख संतोष देवकर, जगदीश पाटील गाढवे, उपतालुकाप्रमुख पांडुरंग गुजर, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, तालुका संघटक प्रविण महाजन, नगराध्यक्ष वैभव देशमुख, माजी सभापती सोंडू पाटील, उपसभापती बालासाहेब पोले, माजी सभापती संतोष खोडके यांच्यासह राजू मोरे, बी. आर. नायक, गंगाराम फटांगळे, अजय पोले, हरिभाऊ काळे, संजय चिलगर, देविदास वाघ, माणिक देशमुख, गजानन नायकवाल, संतोष पोपळघट, संतोष गायकवाड, दत्ता कोरडे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण आणि अटींच्या कर्जमाफीऐवजी सरसकट कर्जमाफी देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. (ShivSena Tractor-Bullock Rally) शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संतप्त शिवसैनिकांनी दिला.

संबंधित सामग्री

दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच! - छगन भुजबळ

दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच! - छगन भुजबळ

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांचं मोठं विधान! शरद-अजित पवार एकत्र आल्यास जुन्या कार्यकर्त्यांना आनंद होईल, अशी भूमिका.

Nov 13, 2026
परभणीतील पाथरीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; दोन नगरसेवकांचे राजीनामे

परभणीतील पाथरीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; दोन नगरसेवकांचे राजीनामे

Pathri Shiv Sena Shinde Group: पाथरी नगरपालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेना शिंदे गटाच्या दोन नगरसेवकांनी पदाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे दिला आहे.

Nov 12, 2026
दोन्ही शिवसेना एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान

दोन्ही शिवसेना एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान

ठाकरे-शिंदे शिवसेना एकत्र येणार? खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; गुलाबराव पाटील आणि भरत गोगावले यांचीही प्रतिक्रिया.

Nov 12, 2026
मुंबईतील रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणी; 'मुंबईत यूपीचं राजकारण नको!'- संजय राऊत

मुंबईतील रेल्वे स्टेशनवर भोजपुरी गाणी; 'मुंबईत यूपीचं राजकारण नको!'- संजय राऊत

मुंबई रेल्वे स्थानकांवरील भोजपुरी गाण्यांवर संजय राऊत आक्रमक. उत्तर प्रदेशच्या राजकारणावरून इशारा; NCP विलिनीकरणावरही मिश्किल टोला.

Nov 12, 2026
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने वाद! मनसे आणि ठाकरे गट आक्रमक

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने वाद! मनसे आणि ठाकरे गट आक्रमक

मुंबईतील वडाळा, सानपाडा आणि आंबिवली रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवल्याने वाद. मनसे आणि ठाकरे गटाने व्यक्त केला संताप.

Nov 12, 2026