चिखली शेतकरी उपोषण

रोहडा–अंत्री खेडेकर रस्त्यासाठीचे उपोषण मागे; उद्यापासून काम सुरू करण्याचे आश्वासन

Chikhali farmers Strike: रोहडा-आंतरी खेडेकर येथील ग्रामस्थांनी पाच महिन्यापासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत असताना, तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

रोहडा–अंत्री खेडेकर रस्त्यासाठीचे उपोषण मागे; उद्यापासून काम सुरू करण्याचे आश्वासन

Chikhali farmers Strike

चिखली (Chikhali farmers Strike) : तालुक्यातील रोहडा व अंत्री खेडेकर येथील शेतकरी व ग्रामस्थांनी रोडा–अंत्री खेडेकर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या मागणीची तात्काळ दखल घेत सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे यांचे प्रतिनिधी सुभाष दराडे यांनी उद्यापासूनच रस्त्याच्या कामासाठी यंत्रसामग्री पाठवून काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर दुपारी चार वाजता उपोषण मागे घेण्यात आले.

रोडा–आंतरीखेडेकर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या पाच महिन्यांपासून ग्रामस्थांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र प्रशासनाने दखल न घेतल्याने दोन्ही गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

उपोषणाला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते नरेंद्र खेडेकर, बाजार समितीचे उपसभापती किसनराव धोंडगे, माजी सभापती राम खेडेकर, आरपीआयचे विदर्भाध्यक्ष संजय वाकोडे आदींचा समावेश होता.

उपोषणकर्त्यांमध्ये राहुल टाकळकर, संजय खेडेकर, सागर खरात, समाधान पेंढारकर , अमोल मोरे, मधुकर शेळके , प्रमोद मोरे, दगडू खेडेकर, उत्तम माळेकर यांच्यासह शिवाजीराव खेडेकर, विनायक खेडेकर, अजाबराव खेडेकर, भिकाजी खेडेकर, शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे गजानन वायाळ , शिवसेना नेते संतोष भुतेकर आदी सहभागी झाले होते.

दरम्यान, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी केंद्रीय मंत्री खा.प्रतापराव जाधव यांचे स्विय साहायक नीरज काकडे उपस्थित होते, त्यानंतर आमदार मनोज कायंदे यांचे प्रतिनिधी सुभाष दराडे यांनी रोहडा ते अंत्री खेडेकर या सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शशिकांत खेडेकर व सुभाष दराडे यांच्या हस्ते आंदोलकांना थंड पेय देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

जनता दरबार सुरू असतानाच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले-पाटील यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी तहसीलदार विजय सवडे, उपविभागीय अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार सौरभ गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

उपोषणाला (Chikhali farmers Strike) पाठिंबा देण्यासाठी रमेश खेडेकर, बाळू पाटील, मिलिंद खेडेकर, पंजाब खेडेकर, वसंतराव खेडेकर, हरिभाऊ खेडेकर, नारायण चितराळे, राजेंद्र बुरकुल, दिपक कळंगे , मोहम्मद शोएब मोहम्मद आसिफ, राहुल लवाळे, एकनाथ खेडेकर, दिलीप मोरे, अमोल खेडेकर, शोभा खरात, भीमराव तळेकर, इंदूबाई तळेकर, सुशीला खरात, अण्णा माळेकर, संजय खरात, रघुनाथ लवाळे, केशवराव सोरमारे, गणेश बुरकुल, परमेश्वर मोरे, रामदास खेडेकर, दीपक खरात, प्रवीण देशमुख, पूंजाजी लवाळे, शिवाजी तळेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायदो व सुव्यवस्था राखण्यासाठी अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रूपेश शक्करगे, पोलीस कर्मचारी भरत पोफळे , रवी गीते तसेच चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

‘देशोन्नती’चा दणका: पातूरच्या रेस्ट हाऊस रस्त्यावरील ‘त्या’ जीवघेण्या खड्ड्यावर प्रशासन जागे

‘देशोन्नती’चा दणका: पातूरच्या रेस्ट हाऊस रस्त्यावरील ‘त्या’ जीवघेण्या खड्ड्यावर प्रशासन जागे

Patur Road Pothole: या बातमीची गंभीर दखल घेत प्रशासकीय यंत्रणा तातडीने हरकतीत आली असून, रविवारी/सोमवारी जेसीबी, यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन खड्ड्यामध्ये मुरूम व खडी.

Jul 28, 2026
परभणीत गोदाकाठ साखर कारखान्याविरोधातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे...!

परभणीत गोदाकाठ साखर कारखान्याविरोधातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे...!

Parbhani Farmers' Hunger Strike: गोदाकाठ साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी शनिवार १० जुलैला उपोषण केले. ते आश्वासन मागत असून ऊस बिलांची रकम उरवलेल्या शेतकारांना आठवड्यात देण्याचा निर्णय घेतला.

Jul 12, 2026
फसव्या कर्जमुक्ती आदेशाची लातूरमध्ये होळी!

फसव्या कर्जमुक्ती आदेशाची लातूरमध्ये होळी!

Farmers' Organization Protest: लातूरात शेतकरी संघटनाने रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देण्याचे आंदोलन केले. त्यांनी कर्जमुक्तीच्या मागण्यावर प्रतिबद्धता दाखवून सरकारच्या फसवणुक

Jun 16, 2026
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेची निदर्शने! 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेची निदर्शने! 

Farmers Loan Waiver Andolan: शेतकऱ्यांना वि.अट, सर. कट कर्जमाफीची तात्काळ मांग करण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात निदर्शन केले गेले. शासनाने ३३ हजार कोटी रुपयांचा मदती पॅकेज

Jun 16, 2026
परभणीत कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप; सेलू तहसिल कार्यालयासमोर आंदोलन...!

परभणीत कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप; सेलू तहसिल कार्यालयासमोर आंदोलन...!

Parbhani Loan Waiver Andolan: विश्वस्त कृषक नेतृत्वाखाली शासनाच्या करजमाफी आदेशावर महाराष्ट्रातील सेलू तहसीलात आंदोलन झाले. लाखो शेतकर्यांना फायदा न देण्याच्या आरोपासाठी निषेध मागणी करत राहिली.

Jun 11, 2026