वसमत बालक मृत्यू

वसमतमध्ये तलावाच्या उघड्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

Vasmat Child Death: वसमत येथील मोठ्या तळ्याच्या खोलीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका आठ वर्षे बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणाने हळहळ व्यक्त होत आहे.

वसमतमध्ये तलावाच्या उघड्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू

Vasmat Child Death

वसमत (Vasmat Child Death) : वसमत येथील मोठ्या तळ्याच्या खोलीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका आठ वर्षे बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणाने हळहळ व्यक्त होत आहे. मयत मुलाच्या पालकांनी दोषी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वसमत शहरातील मोठ्या तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात बुडून आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शेख हसन शेख जाबेर (८) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. तलाव परिसरात असलेल्या दर्गा कडे जाताना बालक खड्ड्यात पडला खड्ड्यात पाणी साचलेले असल्याने त्यात तो बुडाला काम चालू असताना बॅरिकेड्स, धोक्याचे फलक किंवा संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही त्यामुळे हा अपघात घडला बालक खड्ड्यात पडल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

याप्रकरणी (Vasmat Child Death) मयत बालकाच्या पालकांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असे आहे या प्रकरणात चौकशी करून गोष्टी असणार्‍या गुत्तेदार व संबंधित अधिकार्‍यांविरोधात  कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.