पत्नीचे डोके धडावेगळे करणाऱ्या पतीला जन्मठेप

किरकोळ कारणावरून झालेल्या वादात कोयत्याने पत्नीचे डोके धडावेगळे करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पत्नीचे डोके धडावेगळे करणाऱ्या पतीला जन्मठेप

Life Imprisonment

तीन वर्षांपूर्वी कमलापूर येथे घडली होती थरारक घटना; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

परभणी (Life Imprisonment) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात कोयत्याने पत्नीचे डोके धडावेगळे करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथे ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील कमलापूर येथील फिर्यादी व्यंकटी गोविंदराव मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर त्यांचा भाऊ केशव गोविंदराव मोरे व पत्नी आशाबाई यांच्यात शेतात पाणी देण्यासाठी जाण्याच्या कारणावरून वाद सुरू झाला. त्यामुळे व्यंकटी मोरे व त्यांची पत्नी घराबाहेर आले. त्यावेळी केशव मोरे हा हातात कोयता घेऊन पत्नीच्या डोक्यात व तोंडावर सपासप वार करत होता.

केशवचा रुद्रावतार पाहून कुणाचीही भांडण सोडवण्याची हिम्मत झाली नाही. तोपर्यंत या हल्ल्यात आशाबाई गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांचा चेहरा चेंदामेंदा झाला होता आणि धडापासून डोके वेगळे झाले होते.

घटनेनंतर परिसरातील नागरिक जमा झाले. काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८०/२०२२ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सपोनि विजय रामोड यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

सदर खटल्याची सुनावणी एन. पी. त्रिभुवन यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे नितीन खळीकर यांनी काम पाहिले. खटल्यात फिर्यादी, मयताची मुलगी व वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

प्रत्यक्षदर्शी साक्षी, मुलगी-मुलाचा जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. एन. पी. त्रिभुवन यांनी बुधवार, २० मे रोजी आरोपी केशव गोविंदराव मोरे यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. नितीन खडकीकर यांनी बाजू मांडली. तसेच पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी पोउपनि. सुरेश चव्हाण, मपोशि पुष्पा जवादे, पोह. शिवरत्न शिंदे, मपोह वंदना आदोडे व सचिन धबडगे यांनी काम पाहिले.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026