विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

अंबादास दानवे यांचा रिसोड व मालेगाव तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा

Ambadas Danve: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी येत असून, ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेणार

अंबादास दानवे यांचा रिसोड व मालेगाव तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा

Ambadas Danve

 

डही एकंबा, शिरपूर, मांगवाडीतील शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे विश्वनाथ सानप यांचे आवाहन

रिसोड (Ambadas Danve) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी येत असून, ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मालेगाव तालुक्यातील डही एकंबा, शिरपूर तसेच रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथे भेट देऊन पिकांच्या स्थितीची पाहणी केली जाणार आहे. या पाहणी दौऱ्यात परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रिसोड-मालेगाव विधानसभा प्रमुख तथा शिवसेनेचे नेते विश्वनाथ सानप यांनी केले आहे.

​रिसोड व मालेगाव तालुक्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

मालेगाव तालुक्यातील डही, एकंबा व शिरपूर परिसर; ​रिसोड तालुक्यातील मांगवाडी परिसर

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) या दौऱ्यात थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक विम्याची भरपाई, दुष्काळी सवलती आणि आर्थिक मदतीबाबत शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेणार आहेत. त्यानंतर हा प्रश्न विधिमंडळात व शासनाकडे आक्रमकपणे मांडला जाणार आहे. शासनाकडून तातडीने दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा व समस्या विरोधी पक्षनेत्यांसमोर प्रत्यक्ष मांडाव्यात, यासाठी डही एकंबा, शिरपूर, मांगवाडी आणि परिसरातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना नेते विश्वनाथ सानप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधींकडून ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच; देशभरातील जनतेच्या तक्रारी आणि आंदोलनांची माहिती आता एकाच नकाशावर

राहुल गांधी यांनी ‘सत्याग्रह’ पोर्टल लाँच केले. नागरिकांना तक्रारी व आंदोलनांची माहिती नोंदवता येणार असून, विविध संघर्ष डिजिटल नकाशावर जोडले जाणार आहेत.

Oct 03, 2026
घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sep 27, 2026
अंबादास दानवे  यांनी केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी 

अंबादास दानवे  यांनी केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी 

MLA Ambadas Danve: पावसाने पाठ फिरवल्याने रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे गंभीर संकट ओढवले आहे. शेतातील उभी पिके करपून गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून..

Sep 23, 2026
हिंगोली विकासात गडचिरोलीपेक्षाही मागे - अंबादास दानवे

हिंगोली विकासात गडचिरोलीपेक्षाही मागे - अंबादास दानवे

हिंगोली विकासात गडचिरोलीपेक्षाही मागे असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला. प्रलंबित विकासकामे, सिंचन आणि शेतकरी आत्महत्यांवरून सरकारवर टीका केली.

Sep 12, 2026
मुंबई-गोवा खासगी बसमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग; अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा

मुंबई-गोवा खासगी बसमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग; अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा

मुंबई-गोवा महामार्गावरील एका खासगी प्रवासी बसमध्ये महिला प्रवाशासोबत विनयभंग झाल्याची गंभीर घटना समोर आली .

Aug 03, 2026