लातूर (Latur Drizzle Rain) : लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी मान्सूनची रिमझिम हजेरी लागली. मान्सून ने उशिरा का होईना म्हणजे आर्द्रा नक्षत्रात दस्तक दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी चार दिवस लातूर जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. लातूर जिल्ह्यासाठी यंदाचे मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी जिल्ह्यात जवळपास सर्वत्र कमी अधिक प्रमाणात रिमझिम पावसाने हजेरी लावली.
मृग नक्षत्र 22 जून रोजी संपले. आर्द्रा नक्षत्रात दुसऱ्या दिवशी (Latur Drizzle Rain) पावसाने रिमझिम का होईना जिल्हाभरात दस्तक दिल्याने शेतकरी सुखावला आहे. हवामान खात्याने चार दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून चार दिवसात पाऊस पेरणी योग्य होईल का, याची उत्सुकता लागली आहे. बुधवारी लातूर सह तालुक्याच्या काही भागात, औसा तालुक्यातील भादा, आलमला परिसरात, निलंगा तालुक्यातील कासार शिरशी परिसरात, चाकूर तालुक्यात, उदगीर तालुक्यातील उदगीर व वाढवणा परिसरात तसेच रेणापूर तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याचे आमच्या प्रतिनिधींनी कळविले आहे.
लातूर रिमझिम पाऊस
लातूर जिल्ह्यात मान्सूनची रिमझिम हजेरी
Latur Drizzle Rain: हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी चार दिवस लातूर जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. लातूर जिल्ह्यासाठी यंदाचे मृग नक्षत्र कोरडे गेले.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Latur Drizzle Rain