कुणबी जात प्रमाणपत्र

आंबा येथे कुणबी जात प्रमाणपत्र विशेष शिबिर; ५२ नागरिकांनी घेतला लाभ

Kunbi Caste Certificate: समाज मंदिरामध्ये कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी- मराठा पात्र नागरिकांसाठी कुणबी जात प्रमाणपत्र विशेष शिबिर पार पडले. यामध्ये ५२ पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र

आंबा येथे कुणबी जात प्रमाणपत्र विशेष शिबिर; ५२ नागरिकांनी घेतला लाभ

Kunbi Caste Certificate

अर्जदारांना परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन

वसमत (Kunbi Caste Certificate) : तालुक्यातील आंबा येथील समाज मंदिरामध्ये कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी- मराठा पात्र नागरिकांसाठी कुणबी जात प्रमाणपत्र विशेष शिबिर पार पडले. यामध्ये ५२ पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

उपस्थित नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेत उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार सारंग चव्हाण आणि नायब तहसीलदार डॉ. विनोद डोंगावकर उपस्थित होते. आंबा मंडळ अधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त कार्यरत सर्व ग्राम महसूल अधिकारीही शिबिरास उपस्थित होते. 

शिबिरात १४ व्यक्तींची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. त्यांना आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले.

टैग्स: Kunbi Caste Certificate

संबंधित सामग्री

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा: न्यायमूर्ती संदीप शिंदे

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा: न्यायमूर्ती संदीप शिंदे

Kunbi Caste Certificate: उपलब्ध कागदोपत्री नोंदी, वंशावळ व संबंधित पुराव्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ व पारदर्शकपणे करावी

Sep 08, 2026
कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांना दिला थेट इशारा

कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांना दिला थेट इशारा

राज्यात रद्द करण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Aug 06, 2026

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू

कुणबी, कुणबी मराठा व मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजीच्या स्थापनेपासून उपविभागीय स्तरावर सुरू आहे.

Jun 10, 2026