नांदेड (Kishan Bhawar) : ठाणे येथील मराठी साहित्य मंडळाच्या वतीने दिला जाणारा मानाचा 'कला भूषण पुरस्कार' यंदा आंतरराष्ट्रीय योगपटू किशन रंगराव भवर यांना जाहीर झाला आहे. योग या अतिप्राचीन भारतीय कलेचा देश-विदेशात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
येत्या महाराष्ट्र दिनी, लोहा येथे आयोजित 'अक्षरलेणं साहित्य संमेलनात' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याला ख्यातनाम साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर, कंधार-लोहा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि संयोजक डॉ. घ.ना. पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
किशन भवर (Kishan Bhawar) यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अशोकराव गरड, प्रलोभ कुलकर्णी, मीना कदम, स्नेहा कुलकर्णी,पत्रकार पवन जगडमवार, सुप्रिया जोगदंड, शिवाजीराव घोडके, संतोष सूर्यवंशी, मारोती शिंदे, अर्चना तोटावाड, ज्ञानोबा काळे, शांता लाडेकर, अशोकराव नातेवाड, आशा पावडे व डॉ. सायन्ना मठमवार यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.