गेल्या अनेक दिवसापासून उपजिल्हा रुग्णालयात पाण्यासाठी रुग्णाची भटकंती होत होती
कळमनुरी (Kalamnuri Hospital Borewell) : कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झालेली पाण्याची अडचण लक्षात घेऊन नगराध्यक्ष प्रतिनिधी आर. आर. पाटील, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, राजूभाऊ पटणे व नगरसेवक बबलूभाऊ पत्की यांच्या वतीने स्वखर्चातून बोर मारून देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात पाण्याअभावी रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत रुग्णालय परिसरात बोर मारून पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी आर आर पाटील, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील , नगरसेवक बबलूभाऊ पत्की, राजू पटणे, डॉ. नरवाडे, साहेबराव होडबे, कैलास ताटे, गजानन गडदे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
जनतेची गरज आमची जबाबदारी: आर आर पाटील
“जनतेची गरज, आमची जबाबदारी; कळमनुरीच्या विकासासाठी सदैव तत्परअसा संदेश यावेळी देण्यात आला असून यापुढेही जनतेचे जेही कामे राहिले आहेत ते कामे करण्यात आम्ही कटिबद्ध असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रतिनिधी आर आर पाटील यांनी दिली आहे.
रुग्णाची गैरसोय दूर करण्याचे प्रयत्न : उपनगराध्यक्ष शिवराज पाटील
कळमनुरी जिल्हा रुग्णालयात पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांना पाण्याची अडचण होत होती तसेच कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता यामुळे आम्ही स्वखर्चाने बोर मारून उपजिल्हा रुग्णालयातील पाणी प्रश्न दूर करण्याच्या प्रयत्न केला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष शिवराज पाटील यांनी दिली