जांभोरा येथील पाझर तलावाची दुरुस्ती रखडली; पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील गावालगत असलेला पाझर तलाव फुटून आठ महिने उलटले, तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.

जांभोरा येथील पाझर तलावाची दुरुस्ती रखडली; पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

Jambhora Dam

निधी उपलब्ध, निविदा प्रक्रिया पूर्ण; तरीही कामाला मुहूर्त मिळेना..!

सिंदखेडराजा (Jambhora Dam) : सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील गावालगत असलेला पाझर तलाव फुटून आठ महिने उलटले, तरी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, प्रशासकीय दिरंगाईमुळे यावर्षीही शेतीचे नुकसान होणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

गेल्यावर्षी १७ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद सिंचन विभागाचा हा पाझर तलाव फुटला होता. या दुर्घटनेत परिसरातील शेकडो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. तलाव फुटल्यामुळे सिंचनाचा प्रश्न तर निर्माण झालाच, पण आगामी पावसाळ्यात पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तलावाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला असून निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र, तरीही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 'आपल्या मर्जीतील' कंत्राटदाराला काम देण्यासाठी हे प्रकरण रखडवले जात असल्याची चर्चा परिसरात आहे. पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत काम सुरू झाले तरी ते वेळेत पूर्ण होईल का?

घाईघाईत केल्या जाणाऱ्या कामाच्या दर्जाबाबत शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. यासंदर्भात दैनिक देशोन्नतीने जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही

प्रशासकीय संभ्रम:

निविदा प्रक्रिया होऊनही काम का थांबले आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही.जबाबदार अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन, पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावाची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी जांभोरा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

"तलाव फुटल्यामुळे आमचं आधीच मोठं नुकसान झालं आहे. आता पुन्हा पावसाळा येतोय, पण प्रशासनाला जाग आलेली नाही. या तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास तलाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी तीव्र आंदोलन छेडणार - रमेशराव खरात स्थानिक शेतकरी, जांभोरा

संबंधित सामग्री

बुलढाण्यात शिंदेसेनेची मोठी राजकीय हालचाल; मुस्लिम समाजातील शेकडो जण शिवसेनेत

बुलढाण्यात शिंदेसेनेची मोठी राजकीय हालचाल; मुस्लिम समाजातील शेकडो जण शिवसेनेत

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाने पक्षाचा जनसंपर्क विस्तारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची राजकीय हालचाल केली आहे.

Sep 03, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026
राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीला त्यांचे नाव देऊन भूमीचा सन्मान व्हावा!

राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीला त्यांचे नाव देऊन भूमीचा सन्मान व्हावा!

‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

Aug 09, 2026
नगराध्यक्ष सौरभ तायडे यांची समयसूचकता; पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील १५ ते २० वर्षांपासून साठलेला गाळ अखेर उपसला..!

नगराध्यक्ष सौरभ तायडे यांची समयसूचकता; पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील १५ ते २० वर्षांपासून साठलेला गाळ अखेर उपसला..!

सिंदखेडराजा नगरीतील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उदात्त हेतूने सिंदखेडराजा नगर परिषदेने एक मोठे आणि धाडसी पाऊल उचलले आहे.

Jul 16, 2026
बच्चू कडू यांचा ट्रोलर्सवर हल्लाबोल; “घाबरणारा नाही, कोणाचीही पर्वा नाही”

बच्चू कडू यांचा ट्रोलर्सवर हल्लाबोल; “घाबरणारा नाही, कोणाचीही पर्वा नाही”

शिवसेनेत प्रवेश व विधानपरिषद उमेदवारीनंतर बच्चू कडू यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना ट्रोलर्सवर तीव्र प्रतिक्रिया देत राजकीय मुद्द्यांवर परखड मत मांडले.<br/>

May 02, 2026