तंबाखू सेवन कारवाई

हिंगोलीत तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Tobacco-Gutkha Action: तंबाखू व गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार कारवाई

हिंगोलीत तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Tobacco-Gutkha Action

 

१० जणांकडून १८०० रुपये वसूल

हिंगोली (Tobacco-Gutkha Action) : हिंगोली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू व गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने दणका दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा कचेरी कार्यालयात धडक कारवाई करण्यात आली. 

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने राबवलेल्या मोहिमेत कर्तव्यावर असताना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व पदार्थ बाळगणाऱ्या १० कर्मचारी व इतर व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. कोटपा-२००३ कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी या १० जणांकडून एकूण १,८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यापूर्वीच शासकीय कार्यालयात (Tobacco-Gutkha Action) तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले होते. त्यानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली.  जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. यावेळी मानसशास्त्रज्ञ कुलदीप केळकर व मेडिकल सोशल वर्कर आनंद साळवे उपस्थित होते. 

मोहीम सुरूच राहणार  
जिल्हाभरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अचानक भेटी देऊन ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कर्तव्यावर असताना तसेच कामानिमित्त कार्यालयात येताना कोणीही (Tobacco-Gutkha Action) तंबाखू, गुटखा आदींचे सेवन करू नये किंवा सोबत बाळगू नये, असे आवाहन जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाने केले आहे.

संबंधित सामग्री

शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Tobacco-Gutkha Action: हिंगोलीतील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार, तंबाखू-गुटख्याच्या सलूकासाठी करमचाऱ्यांवर 3400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद..

Jul 09, 2026