हिंगोली दूध-खाद्य भेसळयुक्त

हिंगोलीत दूध व अस्वच्छ खाद्यपदार्थांचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

Hingoli milk-food adulterated: हिंगोलीत भेसळयुक्त दूध व खाद्यपदार्थांची नियमित तपासणी कमी असून, अन्नपदार्थ अस्वच्छपण्याचा धोका आहे. मिठाई, मांस, माशांवर घाण यांचा वापरही सुरू

हिंगोलीत  दूध व अस्वच्छ खाद्यपदार्थांचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

Hingoli milk-food adulterated

हिंगोली (Hingoli milk-food adulterated) : हिंगोली शहरासह ग्रामीण भागात भेसळयुक्त दूध व अस्वच्छ खाद्यपदार्थांची सर्रास विक्री सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हॉटेल्स, मिठाई दुकाने, रस्त्यावरील गाडे व आठवडी बाजारात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ कोणत्याही नियंत्रणाशिवाय विकले जात आहेत. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक व सामाजिक संघटनांकडून केला जात आहे.

शहरातील अनेक दूध केंद्रांवर पाण्याची भेसळ करून दूध विकले जात आहे. काही ठिकाणी युरिया, स्टार्च व डिटर्जंट पावडर मिसळून दुधाला कृत्रिम घट्टपणा आणला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सकाळी व सायंकाळी येणाऱ्या दुधाच्या गाड्यांची कोणतीही तपासणी होत नाही. त्यामुळे लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

याशिवाय शहरातील बसस्थानक परिसर, गांधी चौक, इंदिरा चौक व इतर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव दिसून येतो. उघड्यावर ठेवलेले मांस, माशांवर बसणारी घाण, शिळे अन्न पुन्हा गरम करून विकणे, यासारखे प्रकार राजरोस सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर तर कोणतेच नियम पाळले जात नाहीत. मिठाई व बेकरी उत्पादनांमध्येही भेसळीचे प्रमाण वाढले असून खराब मावा व रंगांचा वापर सर्रास केला जातो.

विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाकडे याबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही कारवाई होत नाही. वर्षातून एखाद्या वेळी नावापुरती धाड टाकली जाते. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ व तपासणी किट नसल्याचे कारण पुढे केले जाते. (Hingoli milk-food adulterated) परिणामी व्यापाऱ्यांचे फावते व सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भेसळयुक्त दूध व खाद्यपदार्थांच्या नियमित तपासण्या कराव्यात, दोषींवर FSSAI कायद्यानुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, आठवडी बाजार व रस्त्यावरील विक्रेत्यांची नोंदणी करून परवाने तपासावेत, अशा मागण्या होत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. 

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या (Hingoli milk-food adulterated) अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. जिल्ह्यातील नागरिक मात्र प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे संताप व्यक्त करीत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर साथीचे आजार पसरण्याची भीती असल्याने तातडीने तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

संजीवनी नगर परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

संजीवनी नगर परिसरातील विविध समस्या तातडीने सोडविण्याची मागणी

Kanhan Development Forum: कांद्री नगरपंचायत संजीवनी नगर परिसरात विविध समस्या निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका ऱ्यांनी मुख्याधिकारी सचिन गाढवे आणि नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांना निवेदन

Jul 12, 2026
तुकाराम मुंढे यांची मुंबईत मोठी कारवाई; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ हॉटेल्स, बेकरी आणि क्लबचे परवाने निलंबित

तुकाराम मुंढे यांची मुंबईत मोठी कारवाई; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ हॉटेल्स, बेकरी आणि क्लबचे परवाने निलंबित

अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या विशेष अन्नसुरक्षा तपासणी मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Jun 30, 2026
राधे नगरातील सांडपाणी व बंद नाल्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडे तक्रार

राधे नगरातील सांडपाणी व बंद नाल्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडे तक्रार

Shirla Gram Panchayat Wastewater: पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील बंजारा नगर व गहीलोत लेआउट लगत असलेल्या राधे नगर परिसरात साचलेल्या दूषित सांडपाण्यामुळे व बंद पडलेल्या नाल्यांमुळे..

Jun 28, 2026
हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

Hingoli Oil Violation Action: हिंगोलीत हॉटेल, ढाबे आणि इतर व्यावसायिकांमध्ये तळण्याच्या तेलाचा पुनरापेक्ष सतत वापर करून फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Jun 11, 2026