परभणीत खा. छत्रपती शाहू महाराज यांच्या पीएचे घर फोडले; साडेपाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य प्रवेश द्वाराचे कुलूप तोडून घरातील साडे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवार ३१ मे रोजी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

परभणीत खा. छत्रपती शाहू महाराज यांच्या पीएचे घर फोडले; साडेपाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

House Burglary

परभणी (House Burglary) : परभणीतील गंगाखेड शहरातील यज्ञभुमी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य प्रवेश द्वाराचे कुलूप तोडून घरातील साडे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवार ३१ मे रोजी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की खा. छत्रपती शाहू महाराज यांचे पीए सतिश बाबा चांडे यांच्या पत्नी नंदा सतिश चांडे या गंगाखेड शहरातील यज्ञभुमी परिसरात सायस भेंडेकर यांच्या घरी राहतात. त्या घराला कुलूप लावून मुलांसह माहेरी अकोली ता. गंगाखेड येथे गेल्या असता रविवार ३१ मे रोजी सकाळी ६ वाजता घरमालक सायस भेंडेकर यांनी फोन करून घराचे कुलूप तुटलेले दिसत आहे असे सांगितले.

यानंतर नंदा सतिश चांडे यांनी घरी येऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत बॅगमध्ये ठेवलेले चार तोळे वजनाच्या सोन्याच्या ४ बांगड्या व दीड तोळे वजनाचे सोन्याचे शॉट गंठण असा एकूण २ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा ऐवज व महत्वाची कागदपत्रे लंपास केल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत या परिसरात पाच जणांची घरे फोडण्यात आल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवार ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते रविवार ३१ मे रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान ही घरफोडी झाल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड, राम गित्ते, पोलीस शिपाई पवन राऊत आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026