हिंगोली स्त्री रुग्णालय

हिंगोलीला १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आरोग्य सुविधांना मोठी चालना

Hingoli Women's Hospital: हिंगोलीच्या १०० खाटांचे स्त्री रुग्णालय बांधण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी केंद्र-सार्वभौमिक सहभागाने मंजूर. यामुळे महिलांसाठी विशेष उपचार, प्रसूती सेवा

हिंगोलीला १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आरोग्य सुविधांना मोठी चालना

Hingoli Women's Hospital

हिंगोली (Hingoli Women's Hospital) : हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम (PMJVK) अंतर्गत १०० खाटांच्या स्त्री रुग्णालय बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून उपलब्ध करून देण्यात आला असून, शासन निर्णय दि. १६ जून २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. 

या योजनेअंतर्गत अमरावती, हिंगोली, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील एकूण पाच रुग्णालयांच्या बांधकामासाठी टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जात आहे. (Hingoli Women's Hospital) हिंगोली जिल्ह्यासाठी प्रस्तावित १०० खाटांचे स्त्री रुग्णालय हा महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प असून, यासाठी यापूर्वीही निधी उपलब्ध करून देण्यात आला होता आणि आता आणखी रु. ५०० लाख (५ कोटी) वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या (Hingoli Women's Hospital) प्रकल्पामुळे महिलांसाठी विशेष उपचार सुविधा, प्रसूती सेवा, अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा आणि जिल्हास्तरावरील आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या महिलांना उपचारासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागण्याची समस्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाने हा निधी SNA-SPARSH प्रणालीद्वारे आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्यामार्फत वितरित करण्याचे निर्देश दिले असून, कामे नियमानुसार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, आता प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.