हिंगोली (Jal Jeevan Mission) : जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे विहित तसेच वाढीव मुदत देऊनही पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहअध्यक्ष जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सहअध्यक्ष विवेक गायकवाड यांच्या शिफारशीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आले आहे.
सेनगाव तालुक्यातील मौजे उटीपूर्णा येथील योजनेचे कंत्राटदार अष्टविनायक ग्रुप, प्रोप्रा. राधेश्याम ज्ञानबाराव डव्हळे, पिंपरी लिंग व बामणी खुर्द येथील योजनेचे कंत्राटदार निखील सुभाष नाईकवाडे, आणि हिंगोली तालुक्यातील भटसावंगी येथील योजनेचे कंत्राटदार भगवानबाबा कन्स्ट्रक्शन, प्रोप्रा. नामदेवराव घुले तसेच खंडाळा येथील योजनेचे कंत्राटदार निलकंठेश्वर बिल्डकॉन, प्रोप्रा. लक्ष्मण प्रल्हाद मुंढे यांना ब-१ करारानुसार देण्यात आलेली नळ पाणी पुरवठा योजनांची कामे त्यांनी नियोजित मुदतीत पूर्ण केली नाहीत.
संबंधित कंत्राटदारांना वाढीव मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कामे पूर्ण न झाल्याने ब-१ करारातील अटी व शर्तींनुसार दंडात्मक कारवाईच्या अनुषंगाने त्यांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, संबंधित कंत्राटदारांची नावे शासनाच्या काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या शिफारशीसह मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर करण्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत कळविण्यात आले असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जल जीवन मिशन
विहित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे प्रस्तावित
Jal Jeevan Mission: जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनांची कामे विहित
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Jal Jeevan Mission
टैग्स:
Hingoli water project delays
contract violations
contractual penalties
water supply contractors
municipal notice
Hingoli municipal services
संबंधित सामग्री
हिंगोलीतील नवा मोंढा भागानंतर आता रिसाला बाजारातील 535 जणांना प्रशासनाने बजावली नोटीस
Hingoli Risala Bazaar: हिंगोलीतील रिसाला बाजारातील 535 मालमत्ताधारकांना प्रशासनाने मालकी हक्कावर नोटीस देऊन कायदेशीर पुरावे सादर करण्याचा आदेश दिला आहे.
May 31, 2026